Yashomati Thakur’s direct allegations against Maharashtra government, Commission : लोकशाहीचा हक्क हिरावला जातोय, निर्णय तात्काळ मागे घ्यावा
Nagpur : काही वॉर्डांमध्ये अचानकपणे निवडणुका न घेण्याचा निर्णय हा पूर्णपणे मनमानी आणि लोकशाहीला धक्का देणारा आहे, अशी कठोर टीका राज्याच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही प्रभाग अचानक प्रक्रियेबाहेर काढण्याचे कोणतेही ठोस कारण आयोगाने स्पष्ट न केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
यशोमती ठाकूर यांनी सरकार आणि निर्वाचन आयोगावर सरळसरळ मिलीभगतीचा आरोप करत दोहोंचीही भूमिका लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप केला. निवडणूक थांबवण्यामागे कोणताही न्याय्य आणि पारदर्शक आधार नाही. नागरिकांचा प्रतिनिधी निवडण्याचा मूलभूत हक्क हिरावला जात आहे, असे ठणकावून सांगत ठाकूर यांनी हा निर्णय जनतेवरील अन्याय असल्याचे म्हटले आहे.
Sudhir Mungantiwar : मुल जाहिरसभेत मुनगंटीवारांचा काँग्रेसवर हल्लाबोल !
ठाकूर पुढे म्हणाल्या की, न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशांनुसार निवडणुका नियमित पद्धतीने घेणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत अचानक काही वॉर्डांना निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर काढणे, हा केवळ नियमबाह्य निर्णय नसून लोकशाहीची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. संबंधित प्रभागांतील नागरिकांना प्रतिनिधी निवडण्यापासून दूर ठेवणे म्हणजे संपूर्ण प्रशासनच जनादेशापासून घाबरतेय, असा टोलाही त्यांनी लगावला.
RTO Department : HSRP साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; त्यानंतर नो एक्स्टेन्शन, थेट दंड !
जनतेचा आवाज दाबणारे असे निर्णय स्वीकारार्ह नाहीत. निवडणुका थांबवण्याची वास्तविक गरज असती तर आयोगाकडे ठोस कारणे, आकडेवारी किंवा परिस्थितीचे तर्कसंगत विश्लेषण सादर करण्याचे दायित्व होते. मात्र तसे काहीच न करता सरसकट वॉर्ड बाद करणे म्हणजे अत्यंत संशयास्पद बाब आहे, असा आरोप ठाकूर यांनी केला. याशिवाय, ठाकूर यांनी स्पष्ट शब्दांत मागणी केली की सरकार आणि निर्वाचन आयोगाने हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा व सर्व वॉर्डांत नियमितपणे निवडणुकांची प्रक्रिया पार पाडावी.
Winter Session of Parliament : हिवाळी अधिवेशनाआधी ‘वर्गणी’चा खेळ ?
लोकशाहीचे रक्षण करणे हे शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे. जनतेला मतदानापासून दूर ठेवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असेही त्या म्हणाल्या. या वादामुळे आगामी निवडणुकांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे.








