Leaders in the education sector will test their political future : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणुकीचे पडघम
Amravati अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची आगामी निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची ठरणार आहे. पैठणी देऊन मते मिळवल्याच्या आरोपांमुळे डिसेंबर २०२० मध्ये झालेली निवडणूक विशेष गाजली होती. त्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी अनपेक्षित विजय मिळवला होता. आता मात्र शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी मतदार नोंदणीच्या धावपळीत आहेत. त्यातच बच्चू कडू यांच्यासह अनेक राजकीय नेतेही या निवडणुकीत भाग्य आजमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील निवडणुकीत भाजप, शिवसेना यांसारख्या प्रमुख पक्षांना धूळ चारत सरनाईक विजयी झाले होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री, मंत्री आणि बडे नेते यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पाचही जिल्ह्यांत सभा व बैठका घेतल्या होत्या. तरीही सर्वांवर मात करून सरनाईक विजयी झाले होते.
Match Controversy : पाकड्यांनी भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच त्याच्या कृतीतून…,
किरण सरनाईक हे वाशीम जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्ष राहिले असून, संस्थाचालक मंडळाचे विभागीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज सांभाळले आहे. प्रसारमाध्यमांपासून दूर राहून काम करण्याची त्यांची शैली चर्चेत राहिली आहे. आगामी निवडणुकीत त्यांच्या विरोधात राजकीय पक्ष कोणती व्यूहनीती आखतात, याकडे लक्ष लागले आहे.
Eknath Shinde : एकनाथ शिंदे काही शिवसेना मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज !
शिक्षक मतदारसंघात सुमारे ४० हजार मतदारांची नोंदणी होण्याचा अंदाज आहे. या निवडणुकीत पूर्वी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, शिक्षक भारती यांसारख्या शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी रिंगणात उतरत असत. त्यांना राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत असे. मात्र, यंदा थेट राजकीय पक्षांनीच निवडणुकीच्या रणधुमाळीत उडी घेतल्याने चुरस अधिक वाढली आहे.








