Breaking

Election-of-the-purchasing-and-selling-organization : खरेदी-विक्री संस्थेच्या निवडणुकीत ‘छत्री’ विरुद्ध ‘हेलिकॉप्टर’

‘Umbrella’ vs ‘Helicopter’ battle to be held : संग्रामपूरमध्ये काट्याची लढत; नव्या नेतृत्वासाठी जुनाच संघर्ष

Buldhana संग्रामपूर खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या १५ संचालक पदांसाठी निवडणूक ३१ मे रोजी होत आहे. ‘शेतकरी सहकार विकास आघाडी’ विरुद्ध ‘शेतकरी परिवर्तन पॅनल’ अशी दोन प्रभावी पॅनलमध्ये थेट लढत होणार आहे. ‘छत्री’ आणि ‘हेलिकॉप्टर’ ही चिन्हे घेऊन मैदानात उतरलेले दोन्ही पॅनल विजयासाठी जोमाने प्रचार करत आहेत.

८१९७ मतदार या निवडणुकीत आपले मताधिकार बजावणार आहेत. या निवडणुकीस राजकीय वळण लागले आहे. मात्र तरीही ती ‘पक्षविरहित’ असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र दोन्ही पॅनलमध्ये सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व समर्थक सहभागी असल्याने ही निवडणूक राजकीय प्रतिष्ठेचा विषय ठरत आहे.

Load shedding : लोणारमध्ये वीजेचा लपंडाव; उद्धवसेना आक्रमक

एकूण ३३ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या गणितात उलथापालथ करू शकतात. विशेषतः ‘सर्वसाधारण मतदार संघ’ आणि ‘सोसायटी मतदार संघ’ या दोन विभागांतील लढती विशेष लक्षवेधी ठरत आहेत. फक्त २६ मतदार असलेल्या सोसायटी मतदारसंघात ५ जागांसाठी मोठी चुरस आहे. येथे प्रत्येक मत ‘राजकीय वजन’ ठरवणारे ठरणार आहे.

Santosh Deshmukh murder case : वाल्मिकला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट, बडतर्फ पीएसआयचा दावा !

सध्या प्रचार दुसऱ्या टप्प्यात असून उमेदवार गावागावात प्रत्यक्ष संपर्क साधत आहेत. तब्बल नऊ वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने शेतकरी आणि सहकारी क्षेत्रातील कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. ही निवडणूक फक्त संस्थेची नसून, तालुक्यातील राजकीय समीकरणांची चाचणी मानली जात आहे.

प्रशासकीय तयारीही अंतिम टप्प्यात असून निवडणूक अधिकारी म्हणून कृपलानी कार्यरत आहेत. ‘छत्री की हेलिकॉप्टर?’ याचे उत्तर ३१ मे रोजी मतपेटीतूनच स्पष्ट होणार आहे.