Election process of 63 co-operative societies started The election process was suspended : १५१ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती
Amravati : सहकार क्षेत्रातील लांबणीवर पडलेल्या संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सहा जानेवारीपासून प्रारंभ झाली आहे. मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यासंदर्भातील पत्र सहकार आयुक्त यांनी संबंधित सहकारी संस्थांना दिले आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ३१ डिसेंबरपर्यंत आहे त्या टप्प्यावर १५१ सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती, हे विशेष.
दरम्यान ‘ड’ वर्गीय ८८ संस्थांच्या निवडणुका आटोपण्यात आल्याने ६३ संस्था बाकी होत्या. या सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया ६ जानेवारीपासून प्रारंभ करण्याचे आदेश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. त्यानुसार १ जानेवारी या अर्हता दिनांकावर मतदार यादी तयार करण्याचे आदेश डीडीआर व संबंधित एआर यांनी सोमवारी दिले. विधानसभा निवडणुकांमुळे या सर्व संस्थांची निवडणूक प्रक्रिया बाधित झाली होती.
Ashish Jaiswal : रामटेकला मंत्री मिळाले; आता विकासाची प्रतिक्षा !
३१ डिसेंबर झाल्यानंतर प्राधिकरणाच्या आदेशाची प्रतीक्षा सहकार विभागाद्वारा सुरू आहे. असे असताना ३ तारखेला उशिरा प्राधिकरणाचे पत्र सहकार विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार १ जानेवारी २०२५ या अर्हता दिनांकावर मतदार यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले. निवडणुकीसाठी निधी कार्यालयात जमा करण्याचे आदेश ‘ब’ वर्गीय ३६ संस्थांना जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार व ‘क’ वर्गीय २७ सहकारी संस्थांना संबंधित सहा निबंधक यांनी ६ जानेवारीला पत्र दिले आहे.
या सर्व सहकारी संस्थांमध्ये निवडणुकीची लगबग वाढली आहे. यामध्ये ‘ब’ वर्गीय ३६ सहकारी संस्थांमध्ये २७ सेवा सहकारी सोसायट्यांचा समावेश आहे. शिवाय काही पतसंस्थांचा समावेश असल्याची माहिती सहकार विभागाने दिली.
MLA Harish Pimple : आमदाराने विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना डांबले !
या सोसायटीची होणार निवडणूक
सेवा सहकारी सोसायटी भिलोना, वासनी, बेंबळा, दर्यापूर, मोझरी, बेनोडा, वलगाव, नांदगावपेठ, सासन, जळका हिरापूर, निंभा, पूर्णानगर, ब्राम्हणवाडा थडी, बोराळा, जालनापूर, करजगाव, तोंडगाव, हनवतखेडा, कोल्हा, निंभारी, येसुर्णा, रोशनखेडा, जामगाव, राजूराबाजार, खानापूर, अंबाडा व नया अकोला, तसेच चांदूरबाजार तालुका औद्योगिक सहकारी संस्था, धन्वंतरी रुग्णालय सहकारी संस्था, अष्टविनायक नागरी पतसंस्था, दुर्गा बांबू उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था, प्रहार कृषी संस्था, महात्मा फुले ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, अमरावती खंडविकास औद्योगिक संस्था, विभागीय सेवायोजन कर्मचारी पतसंस्था, चांदूर रेल्वे खंडविकास औद्योगिक संस्था व तिवसा तालुका बहुउद्देशीय औद्योगिक कारागीर सहकारी संस्थेमध्ये निवडणूक प्रक्रिया राहणार आहे.