Election results : मुंबईत काँग्रेसचा पहिला धक्का देणारा विजय, मलिक कुटुंबाला हादरा

Chief Minister Mamebhau defeated, some thrilling results in municipalities : मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ पराभूत, राज्यातील 29 महापालिकांमध्ये काही थरारक निकाल

Mumbai : राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणूक निकालांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आघाडीला यश मिळाल्याचे चित्र असले तरी मुंबईसह अनेक ठिकाणी अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल समोर आले आहेत. मुंबईत जाहीर झालेला पहिला निकाल काँग्रेसच्या पारड्यात गेला असून धारावीमधून आशा काळे यांनी विजय मिळवत काँग्रेसचे खाते उघडले आहे.

मुंबईतील प्रभाग क्रमांक 183 धारावी येथून काँग्रेसच्या आशा काळे या 1450 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या वैशाली शेवाळे यांचा पराभव केला. वैशाली शेवाळे या माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी असल्याने हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. त्याचवेळी मुंबईतील प्रभाग क्रमांक 2 मधून शिंदे गटाच्या तेजस्वी घोसाळकर यांनी तब्बल 10 हजारांहून अधिक मतांनी मोठा विजय मिळवला असून ठाकरे गट आणि काँग्रेसच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

BMC elections : भाजपचे बहुचर्चित उमेदवार नवनाथ बन विजयी

मुंबईतीलच प्रभाग क्रमांक 165 मध्ये काँग्रेसचे आशरफ आझमी विजयी झाले असून त्यांनी कप्तान मलिक यांचा पराभव केला आहे. कप्तान मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांचे बंधू असल्याने हा निकाल मलिक कुटुंबासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत शिंदे गटाचे खासदार रविकांत वायकर यांच्या मुलीचा पराभव झाला असून त्या ठिकाणी ठाकरे गटाच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.

मुंबईबाहेरही निकालांनी अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने पहिला विजय नोंदवला असून प्रल्हाद म्हात्रे विजयी झाले आहेत. कोल्हापूर महापालिकेतील सर्वाधिक हायव्होल्टेज मानल्या जाणाऱ्या लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसच्या राहुल माने यांचा पराभव केला आहे. हा निकाल काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

पुण्यात शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रशांत जगताप विजयी झाले असून त्यांच्या विजयामुळे काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. अमरावतीमध्ये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांना पराभव पत्करावा लागला आहे. संबंधित प्रभागात काँग्रेसचे सर्व उमेदवार विजयी झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

BMC ELECTIONS: ठाकरेंना सोडून भाजपमध्ये गेल्या, निवडणूक जिंकल्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या कुटुंबासाठी आनंदाची बातमी ठरली असून त्यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही विजयी झाले आहेत. एकूणच या निकालांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय ताकदीचे गणित बदलताना दिसत असून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.