Breaking

Election voting : वाढीव मतदानासंदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली;

What is observation? Prakash Ambedkar soon. presented with a role : नेमके निरीक्षण काय? प्रकाश आंबेडकर लवकरच भूमिका मांडणार

Mumbai : विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या 76 लाख मतांबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. पण, मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. न्यायालयाने याचिका फेटाळताना नेमके काय निरीक्षण नोंदवले आहे हे तपासून लवकरच भूमिका जाहीर करू असे आंबेडकरांच्या वतीने सांगण्यात आले आहे

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर सर्वच विरोधी पक्षांनी शंका उपस्थित करत निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं होतं. विशेष म्हणजे, खा. संजय राऊत आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सायंकाळी 6 नंतर वाढलेल्या 76 लाख मतदारांचा आकडा संशयास्पद असल्याचे म्हटले होते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर 25 जून रोजी निकाल देण्याचे जाहीर केले होते.
आज प्रकाश आंबेडकर यांची याचिका फेटाळली आहे. तसेच, न्यायालयाचा वेळ वाया घालवला असं निरीक्षणही नोंदवलं

Crowd advantage : महिला पोलिस अधिकाऱ्याच्या विनयभंगाचा आरोप, भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा !

प्रकाश आंबेडकर यांच्यावतीने 76 लाख मतदारांचा मुद्दा उपस्थित करत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, आंबेडकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्ते आणि आमचा कालच्या कामकाजाचा वेळ वाया घातला, असे निरीक्षणही हायकोर्टाने निर्णय देताना नोंदवले आहे. त्यामुळे, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता न्यायालयाने आपला निर्णय स्पष्टपणे दिला त्यामुळे या संदर्भात केलेल्या आरोपात तथ्य नाही असे न्यायालयाच्या निरीक्षणात दिसल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे.

Local Body elections : ‘भाऊ’, ‘भाई’ अन् ‘दादां’नी कसली कंबर !

न्यायालयाने याचिका फेटाळली. न्यायालयाकडून हा निकाल अपलोड झाल्यानंतर नेमकं याचिका फेटाळण्याचं कारण काय हे पाहता येईल. त्यानंतरच, मी प्रतिक्रिया देईल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मुंबईतील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहे, अशी माहितीही आंबेडकर यांनी दिली.

___