व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Electrical distribution transformer : डीपी प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप; शेतकऱ्यांचा प्रशासनावर संताप

Electrical distribution transformer : डीपी प्रकरणात गैरव्यवहाराचा आरोप; शेतकऱ्यांचा प्रशासनावर संताप

Electrical distribution transformer fund transferred : मंजूर डीपी वळविल्याचा आरोप; भाजपा तालुकाध्यक्षांचा महावितरणवर निशाणा

Khamgao तालुक्यातील पिंप्री गवळी येथील शेतकऱ्यांनी मंजूर झालेली डीपी (विद्युत वितरण ट्रान्सफॉर्मर) तात्काळ बसवावी आणि संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत ३० मार्च रोजी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र शिंगोटे यांनी शेतकऱ्यांची बाजू जोरदारपणे मांडत प्रशासनावर गंभीर आरोप केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्री गवळी येथील शेतकऱ्यांसाठी आमदार आकाश फुंडकर यांच्या माध्यमातून ‘भगत डीपी’ मंजूर करण्यात आली होती. मात्र, आरोपानुसार काही स्थानिक घटकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून मंजूर डीपी अन्य ठिकाणी वळवून ‘काळे-देशमुख डीपी’ बसविल्याचा प्रकार घडल्याची चर्चा आहे.

District Bank election : बिनविरोध संचालकांमुळे राजकीय समीकरणे बदलणार?

यामुळे दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कांद्याचे उभे पीक पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यापूर्वीही १२ फेब्रुवारी २०२६ रोजी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली होती; मात्र त्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला.

Maharashtra politics : ‘ऑपरेशन टायगर’ला ब्रेक? एकनाथ शिंदे यांच्या मोठ्या प्लॅनला भाजपचा रेड सिग्नल!

भाजपा तालुकाध्यक्ष नरेंद्र शिंगोटे यांनी यावेळी आरोप केला की, “एकीकडे शासन अवैध वीजजोडण्यांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड आकारते, तर दुसरीकडे काही अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासत अवैध डीपी बसविण्यास प्राधान्य देतात. हा प्रकार गंभीर असून याची चौकशी होणे गरजेचे आहे.” निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून मंजूर डीपी मूळ ठिकाणी बसवावी, अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

error: Content is protected !!