Breaking

Employment Guarantee Scheme : उधारीवरच राबायचे?, मजुरीला हरताळ, निधी रखडला !

 

Laborers of Yavatmal District are waiting for wages worth Rs 10.82 crore : मजुरांना १० कोटी ८२ लाखांच्या मजुरीची प्रतीक्षा

Yavatmal News : ग्रामीण भागातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी रोजगार हमी योजनेतून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. सिंचन विहिरी, गोठा आदी कामे या योजनेतून केली जातात. पण आता या नियमाला हरताळ फासला जात आहे. नोव्हेंबर महिन्यापासून कुशल व अकुशल कामांचा ३० कोटी रुपयांचा निधी रखडला आहे. रोहयोच्या कामावर उधारीतच राबायचे काय, असा प्रश्न उपस्थित कष्टकऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना शेतात मजुरीचे काम करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यातून बारमाही रोजगार मिळत नाही. खरीप हंगामात महिला व पुरुषांच्या हाताला काम मिळते. मात्र, त्यांनतरच्या हंगामात मजुरांना कामासाठी शोधमोहीम करावी लागते.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर !

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी अनेक कुटुंब महानगरांसह परराज्यात स्थलांतरित होतात. स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार हमीची मात्रा देण्यात आली. प्रत्यक्षात येथे राबल्यावर मजुरांच्या हातात वेळेत मजुरी पडत नाही. राबायचे रोहयोच्या कामावर आणि उधार उसनवारीवर संसाराचा गाडा ओढायचा, असा प्रकार सध्या सुरू आहे. अद्यापही १० कोटी ८२ लाखांच्या मजुरीची मजुरांना प्रतीक्षा आहे.

दोन हजारांवर लाभार्थ्यांनी सिंचन विहिरी व गोठ्यांची कामे पूर्ण केली. त्यांनी उधारीने साहित्य बाजारातून आणले. निधीअभावी लाभार्थी अडचणीत आले आहेत. निधी मागणीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र अजून निधी आलेला नाही.

Prataprao Jadhav : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ची देशभरात भरीव कामगिरी !

कुशलसाठी दहा कोटी ८२ लाख व अकुशलसाठी २० कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा निधी लवकर मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रतीक्षा करण्याशिवाय सध्या तरी दुसरा पर्याय नाही. मजुरांसह लाभार्थीही प्रशासनाकडे आमच्या पैशाचे काय झाले, अशी विचारणा करत आहेत.