Breaking

Employment of the poor people : गरीबांचा रोजगार हिसकावून नाही होणार शहराचा विकास !

Sitabardi Hawkers Welfare Association against Nagpur Municipal Corporation and Police : सीताबर्डी बाजारपेठेतील हॉकर्स आंदोलनाच्या पावित्र्यात

Nagpur : नागपूर महानगरपालिका आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करत सीताबर्डी बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावरील हॉकर्सना हुसकावून लावले. यामुळे रस्ता अतिक्रमणमुक्त झाला. राज्य सरकारने एप्रिल २०२४ मध्ये काढलेल्या राजपत्रातील आदेशानुसार ही कारवाई केली. सीताबर्डीतून हटवून हॉकर्सना महाराज बाग रस्त्यावर जागा देण्यात आली आहे. पण सीताबर्डी हॉकर्स असोसिएशनने याला विरोध केला आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत चौधरी आणि पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी २१ मे रोजी पथ संचलन केले. अतिक्रमण हटवल्यानंतर तेथे दुचाकी व चारचाकी वाहनतळ सुरू करण्यात आले आहे. मनपाच्या वाहतूक विभागातर्फे पट्टे आखून मार्गदर्शक चिन्हांचे फलकदेखील लावण्यात आले आहेत. याशिवाय सीताबर्डी बाजारातील मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या तसेच दुकानाच्या बाहेर विक्रीसाठी साहित्य ठेवणाऱ्या दुकानादारांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सुचना मनपा आयुक्तांनी दिली आहे.

Market price of agricultural products : चार महिन्यांत ६१ शेतकरी आत्महत्या, पात्र ठरल्या फक्त नऊ !

सीताबर्डी हॉकर्स असोसिएशन मनपा तसेच पोलिस विभागाच्या कारवाईच्या विरोधात उभी ठाकली आहे. काल (२७ मे) असोसिएशनने पत्रकार परिषद घेऊन या कारवाईचा विरोध केला आहे. ही कारवाई थांबवली नाही, तर आंदोलन करू, असा इशारा असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष रज्जाद कुरेशी यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत कुरेशी म्हणाले. १३ मे रोजी मनपाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात अचानक येऊन हॉकर्सना हुसकावून लावले. कोणतेही लिखीत पत्र न देता ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे आमचा रोजगार हिरावला गेला आहे.

Banking sector : बॅंकिंग क्षेत्रातील मुद्द्यांवर सरकारला घेरण्याचे काम उटगी करतील !

यासंदर्भात आम्ही मनपा आयुक्तांसोबत चर्चा केली असता त्यांनी आम्हाला महाराज बाग रस्त्यावर रोजगार करण्याचा सल्ला दिला. पण त्या ठिकाणी आमचा कुठलाही व्यवसाय चालणार नाही. तरुणांचा रोजगार हिसकावून घेऊन तेथे पार्किंग करण्यात आली आहे. याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थवरही होऊ शकतो, असा इशारा कुरेशी यांनी दिला. गरीबांचा रोजगार हिरावून शहराचा विकास होणार नाही, असेही कुरेशी यांनी म्हटले आहे.