Encrochment on Footpath cleared : पोलिस ‘अॅक्शन मोड’वर ; १ हजार ७३ ठिकाणी झाली कारवाई
Nagpur पायी चालणाऱ्यांसाठी राखीव असलेल्या पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. अनेक व्यवसायिकांनी त्यांची दुकाने, ठेले थाटले आहेत. पादचारी मार्ग मोकळे करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ‘फुटपाथ फ्रिडम ड्राईव्ह’ राबविला जात आहे. गेल्या दोन दिवसांत १ हजार ७३ अतिक्रमणांचा सफाया करण्यात आला.
वाहतूक पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी फुटपाथवरील अतिक्रमणासंदर्भातील पत्रकच जारी केले आहे. त्या अनुषंगाने शहरात कारवाईचा सपाटा सुरू झाला आहे. आता पोलिसच कारवाईत उतरल्याने फुटपाथवर व्यवसाय थाटणा-यांना धडकी भरली आहे. शिवाय, पुढील दिवसांत या कारवाईला अधिक वेग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रस्त्यांवरील फुटपाथवर सर्वत्र अतिक्रमण दिसून येते.
कुठे अवैध व्यवसायीकांची गर्दी तर कुठे फुटपाथवर अवैध पार्किंग असले प्रकार सर्वत्र आहेत. फुटपाथवरील अशा अवैध प्रकारातून किंबहुना व्यवयासायातून अनेक गंभीर गुन्हे घडल्याचे चित्र आहे. वास्तविकपणे महापालिकेकडून फुटपाथ मोकळे करणे अपेक्षित आहे. परंतु, पालिकेच्या कारवाईनंतर पुन्हा फुटपाथ व्यवसायीक आपली दुकाने थाटतात. आता थेट वाहतूक पोलिसांनीच ही जबाबदारी स्वीकारली आणि मैदानात उडी घेतली आहे.
पालकमंत्र्यांनीही केल्या होत्या सूचना
चंद्रशेखर बावनकुळे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती होण्याच्या दोन दिवस आधीच त्यांनी महापालिकेत बैठक घेतली होती. शहरातील विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला होता. त्याचवेळी शहरातील अतिक्रण काढण्याच्या सूचनाही केल्या होत्या. पोलिसांची मदत घेऊन अतिक्रमण काढावे. तसेच जे ऐकणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना केल्या होत्या. दरम्यान, त्यापूर्वीच वाहतूक पोलिसांनी फुटपाथ फ्रिडम मोहीम घोषित केली होती.
NDRF centre in Nagpur : संकटांशी दोन हात करण्याचे प्रशिक्षण नागपुरातून!
फुटपाथने घेतला मोकळा श्वास
एमआयडीसी येथील ९०, सोनेगाव ३३, सदर ४७, सीताबर्डी ६८, कॉटन मार्केट ४४, लकडगंज ९४, अजनी ७१, सक्करदरा ३६, इंदोरा ३७, कामठी येथील ११ फुटपाथ मोकळे करण्यात आले. एकूण ५३१ ठिकाणी फुटपाथ मोकळे करण्याची कारवाई करण्यात आली.