Entry in Shinde group : तेजस ठाकरेसह 25 जणांचा शिंदे गटात प्रवेश

Participation of Thackeray group, Congress office bearers, public representatives : ठाकरे गट, काँग्रेसचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचा सहभाग

Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये एक मोठा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य आणि विविध सहकारी संस्थांचे संचालक यांनी शिवसेना शिंदे गटा मध्ये प्रवेश केला.

या पक्षप्रवेशात तेजस ठाकरे यांचे नाव आघाडीवर आहे. ठाकरे गटाचे सक्रिय पदाधिकारी असलेले तेजस ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तेजस ठाकरे हे यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाच्या संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यांचा शिंदे गटात प्रवेश म्हणजे काँग्रेस आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Datta Bharne : अखेर खांदेपालट झालेच, कृषीखाते दत्ता भरणेंकडे

एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना नव्याने पक्षात सामील झालेल्या सर्वांचे स्वागत केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हे सर्वजण खऱ्या शिवसेनेत परतले आहेत. या प्रवेशामुळे पक्षाला ताकद मिळणार असून, मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होईल.” त्यांनी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख करत सांगितले की, गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने विकासकामांचा धडाका लावला असून, ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ या सर्व जनतेच्या हितासाठी सरकार झटत आहे.

या सोहळ्यात मंत्री संजय राठोड यांच्यासह स्थानिक नेतेही उपस्थित होते. यावेळी एकूण २५ जणांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामध्ये माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे माजी उपसभापती, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच विविध सहकारी संस्थांचे संचालक सहभागी होते.

Shivendraraje Bhosale : चिखलीमध्ये चौपदरीकरणासह ५ कामांना हिरवी झेंडी

या पक्षप्रवेशामुळे यवतमाळ जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढली असून, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचा थेट फायदा होणार, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसला हा प्रवेश मोठा धक्का मानला जात असून, निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी शिंदे गटाने मजबूत संघटन उभे करण्याचे संकेत दिले आहेत.