Condemnation of former MLA’s use of unconstitutional language : तहसीलदार-नायब तहसीलदारांचा वीरेंद्र जगताप यांच्यावर रोष
Amravati धामणगाव रेल्वेचे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी येथील नायब तहसीलदारांना २ जुलै रोजी निवेदन देताना असंवैधानिक भाषा व शिवीगाळ केल्याच्या प्रकारावरून महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना एकवटली आहे. जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत जगताप यांच्यावर कारवाईची मागणी केली.
२ जुलै रोजी दुपारी १२ वाजता वीरेंद्र जगताप आपल्या कार्यकर्त्यांसह धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयात आले होते. मतदार यादीतील मृत, दुबार व स्थलांतरित मतदारांची नावे कमी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडील नमुना ७ भरण्यात आलेल्या ८९० अर्जांचे निवेदन देताना त्यांनी तहसीलदार कक्षात असंवैधानिक आणि अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केली, असे निवेदनात नमूद आहे.
Local Body Elections : अकोला जिल्ह्यात ५३१ सरपंचपदांची नव्याने आरक्षण सोडत
नायब तहसीलदार वसंत पखाले यांनाही अशाच प्रकारे शिवीगाळ करत, “निवडणूक विभागात मूर्ख लोक बसतात,” असे म्हणत तीन आठवड्यांत काम पूर्ण करण्याचा दम दिला. तसेच महिला उपविभागीय अधिकाऱ्यांविषयीही अयोग्य उल्लेख केल्याचे निवेदनात म्हटले आहे. तहसीलदारांनी अशा भाषेचा वापर थांबवण्याची विनंती केली असता, “मी हीच भाषा वापरणार, हिंमत असेल तर ३५३ दाखल करून दाखवा,” अशी धमकी दिल्याचा आरोप आहे.
MLA Sanjay Khodke : ‘उडता अमरावती’ होण्यापासून वाचवा, आमदारांची सभागृहात हाक
या प्रकारामुळे वीरेंद्र जगताप यांचे पुढील कोणतेही निवेदन किंवा दूरध्वनी तहसीलदार संघटना स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या वेळी तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष विजय लोखंडे, संजय गरकल, रवींद्र कानडजे, पूजा माटोडे, मयूर कळसे, अक्षय घोरपडे, रामदास शेळके, एल. एस. तिवारी, प्रदीप शेवाळे, पुष्पा दाभेराव, अश्विनी जाधव, उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, प्रदीप पवार, बळवंत अरखराव, अनिल भटकर आदी अधिकारी उपस्थित होते.