Give financial help to the farmer’s Shankarpat : माजी खासदार तडस यांची मागणी; इतर खेळांप्रमाणे मदत करा
Wardha बैलगाडा हा मातीतला खेळ महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होत असतो. विदर्भातील शेतकरी बाराही महिने शेतीत काबाडकष्ट करतो, परंतु निसर्गाच्या कोपामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी संकटाचा सामना करावा लागतो. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी शंकरपटच्या माध्यमातून आनंदाचा क्षण येतो. या खेळाला देखील इतर खेळांच्या तुलनेत सरकारने राजाश्रय द्यावा, अशी मागणी माजी खासदार रामदास तडस यांनी केली.
शंकरपटाचा संपूर्ण खर्च आयोजकांवर असतो. ज्या प्रमाणे इतर खेळाला शासकीय मदत मिळते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील शंकरपटाला प्रोत्साहन देण्याकरिता इतर क्रीडाक्षेत्राप्रमाणेच शंकरपटाला शासनाने मदत करावी, असे असं ते म्हणाले. वडगांव रोड, सेलू येथे स्व. नरहरी कोटंबर (पाटील) आणि मोतीलाल जयस्वाल यांच्या स्मृती प्रीत्यर्थ, साहसिक जनशक्ती संघटना व मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शंकरपट व कृषी महोत्सवाच्या आयोजन करण्यात आले.
Eknath Shinde : मुंबई-पुण्यात उबाठा तर रायगडात शरद पवार गटाला खिंडार !
या शंकरपट स्पर्धेत ३५० फूट सेकंद पट अ गट, ३५० फूट सेकंद पट ब गट, १३०० फूट सेकंद व जोड दानीचा पट- जोडत-दान २१११ फूट या चार गटात एकूण ४५० पेक्षा जास्त बैलजोड्या येणार आहेत. तीन दिवस शंकरपटाचा थरार रंगणार आहे.
Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी सुरू!
यावेळी माजी आमदार राज तिमांडे यांच्यासहित उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक रवींद्र नरहरीपंत कोटंबकर यांनी केले. संचालन व आभार संतोष डाखोळे यांनी केले. राज्यस्तरीय शंकरपट पंच निर्णय कमिटी म्हणून बंडू पाटील, विजय जयस्वाल, मारोतराव बेले, जीवन पांडे, रमेश कळसाईत, श्यामसुंदर बोबडे, दिलीप गावंडे, दिनेश नेमाडे, अभिजित मिस्कीन, चुडामन हांडे, बालू सोनटक्के, पिंटू पांडे हे कार्य करीत आहेत.