Excessive Rainfall Damage : सरकार ओला दुष्काळ जाहीर करणार ?

State Lashed by Heavy Rains; Farmers Await Government Aid : राज्यभर पावसाचा धुमाकूळ, शेतकऱ्यांच्या नजरा मायबाप सरकारकडे

Nagpur : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन अद्यापही पूर्ण झाले नाही. परिणामी सरकार विरोधी पक्ष आणि खासकरून प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या टिकेचे लक्ष्य झाले आहे. राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. लाखो एकर शेतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. कर्जमाफी नाही केली हे शल्य शेतकऱ्यांना आहेच. पण या आस्मानी संकटात तरी सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी आशा त्यांना आहे.

राज्यात ६० लाख एकरपेक्षा अधिक शेतींचे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकार राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या विचारात असल्याचे सांगितले जात आहे. पण त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत. खरीप पिकांच्या नुकसानाची मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल, असे वक्तव्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच केले. पण ही मतदही कर्जमाफीसारखे दिवास्वप्न ठरू नये, असे शेतकरी बोलत आहेत. अशा संकटाच्या समयी शेतकऱ्यांना मदत केली नाही, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधाऱ्यांना अवघड जाऊ शकतात, त्यामुळे आता शेतकऱ्यांना मदत मिळेल, असे बोलले जात आहे.

Reservation controversy : जातिवरचे चष्मे नको, राजासारखं मन ठेवून निर्णय घ्या

राज्यभर पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसाने विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. साताऱ्यातील माण खटाव तालुक्यात अतिरिक्त पाऊस झाला. नदी नाले दुथड्या भरून वाहात आहेत. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोलापूरमध्येही लाखो हेक्टरवरील खरीप पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे.

Manoj Jaiswal : बॉम्बार्डीयव विमान धुळखात, अन् मनोज जायस्वाल सीबीआयच्या ताब्यात !

बार्शी तालुक्यातील आगळगाव, उंबरगे या गावांमध्ये तर ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीन, कांदा, उडीद, मका यांसारखी पिके पार उद्धवस्त झाली. सोलापूरच्या सांगोल्यातील कासारगंगा ओढ्यात १५ आणि १३ वर्षांची दोन मुले वाहून गेली. मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा कहर अजूनही सुरू आहे. एकट्या हिंगोली जिल्ह्यात पावणे तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतशिवारांमध्ये अजूनही पाणी साचून आहे. त्यामुळे सरकारला आता ओला दुष्काळ जाहीर करावाच लागणार, असे एकदरीत चित्र आहे.