11.9% increase compared to last year, Nashik tops, Amravati bottom : गतवर्षाच्या तुलनेत ११.९% वाढ, नाशिक अव्वल तर अमरावती तळात
Mumbai : राज्य उत्पादन शुल्क विभागाने एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांत तब्बल १२ हजार ३३२ कोटी ६२ लाख रुपयांचा महसूल जमा करून विक्रमी कामगिरी केली आहे. गतवर्षी याच कालावधीत ११ हजार १०१ कोटी ३ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. म्हणजेच यावर्षी महसुलात तब्बल ११.९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
राज्यातील उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, नागपूर आणि अमरावती या विभागीय कार्यालयांमार्फत कामकाज पाहिले जाते. या कालावधीत नाशिक विभागाने सर्वाधिक महसूल मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे, तर अमरावती विभाग महसुलाच्या तळात राहिला आहे.
सर्वाधिक ३,०९८ कोटी ११ लाख रुपयांचा महसूल नाशिक विभागातून मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर विभाग दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना ३,०११ कोटी ५८ लाखांचा महसूल मिळाला आहे. पुणे विभागाने १,४२१ कोटी २७ लाख, तर अहमदनगर (अहिल्यानगर) विभागाने १,२१५ कोटी २८ लाख रुपयांचा महसूल मिळवला आहे.
इतर विभागांपैकी मुंबई उपनगर विभागाने १२९ कोटी ६६ लाख, ठाणे विभागाने १७५ कोटी ८० लाख, पालघर विभागाने ८५६ कोटी २१ लाख आणि रायगड विभागाने ८०२ कोटी ७७ लाख रुपयांचा महसूल नोंदवला आहे.
दुसरीकडे, मुंबई शहर जिल्ह्यात महसुलात घट झाली आहे. गतवर्षी २९ कोटी ४७ लाख रुपयांचा महसूल मिळाला होता, तर यावर्षी तो २८ कोटी ८० लाखांवर आला आहे. ही घट सुमारे २.२९ टक्क्यांची आहे. अमरावती विभाग सर्वात कमी महसूल मिळवणारा ठरला असून, त्याला केवळ ८१ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
Namaz at Shaniwarwada : शनिवार वाडा शुद्धीकरण मोहिमेमुळे महायुतीत फूट !
राज्य उत्पादन शुल्क विभागाने सातत्यपूर्ण महसूल वाढीची नोंद करत सरकारच्या महसूल खात्याला मोठा आधार दिला आहे. आगामी तिमाहीतही महसूलवाढ कायम राहील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
___