Exemption on loudspeaker usage for 15 days subject to limit : मर्यादा राखून 15 दिवसांसाठी ध्वनीक्षेपक वापरास सवलत
Amravati बंद जागा वगळता वर्षभरातील 15 सण, उत्सव आणि महत्त्वाच्या दिवशी ध्वनीमर्यादा पाळून ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अधिसूचना जारी केली आहे.
श्रोतगृहे, सभागृहे, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीमर्यादा राखून ध्वनीवर्धक आणि ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत देण्यात आली आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे.
MP Balwant Wankhede : शेतकऱ्यांचे उत्पादन पोहोचेल थेट ग्राहकांपर्यंत
ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2000 अंतर्गत स्थापन केलेल्या ध्वनी प्राधिकरणाने, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राप्त तक्रारींवर कारवाई करावी. तसेच, प्राधिकरणाने निदर्शनास आणलेल्या बाबींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.
Delhi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑनलाईन जागर’!
सवलतीचे 15 दिवस..
छत्रपती शिवाजी महाराज जयंती – 19 फेब्रुवारी
श्रीराम नवमी – 6 एप्रिल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – 14 एप्रिल
बौद्ध पौर्णिमा – 12 मे
श्रीकृष्ण जयंती – 15 ऑगस्ट
गणेश चतुर्थी, गणपती स्थापना – 27 ऑगस्ट
अनंत चतुर्दशी – 6 सप्टेंबर
नवरात्र पंचमी – 26 सप्टेंबर
नवरात्र अष्टमी – 30 सप्टेंबर
नवरात्र नवमी – 1 ऑक्टोबर
दसरा – 2 ऑक्टोबर
दिवाळी सण (धनत्रयोदशी) – 18 ऑक्टोबर
दिवाळी सण (लक्ष्मीपूजन) – 21 ऑक्टोबर
ख्रिसमस – 25 डिसेंबर
नूतन वर्ष स्वागत सोहळा – 31 डिसेंबर