Fadanvis VS Fadanvis : शोभाताई पुन्हा अॅक्टीव, मुख्यमंत्री फडणवीसांच्या घरातूनच सरकारच्या धोरणावर गोळीबार !

Shobhatai is active again, directly attacks Devendra Fadnavis : केवळ प्रशासनावरचा राग नाही, तर राज्य सरकारचा विरोध

Chandrapur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशात राज्याच्या राजकारणात एक वेगळाच स्फोटक प्रसंग घडलेला आहे. अन् तो सुद्धा चक्क फडणवीस यांच्याच घराण्यातून. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणावर त्यांच्याच काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी थेट हल्ला चढवला आहे. मौन बाळगून असलेल्या शोभाताई अधूनमधून अॅक्टीव होतात. आता दीर्घकाळ मौन बाळगलेल्या शोभाताई पुन्हा अॅक्टीव झाल्या. आणि थेट मुख्यमंत्र्यांवरच तोफ डागली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आता त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातूनच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी अनेक मागण्यांसाठी पत्रकार परिषद घेऊन थेट सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. “आपला पुतण्या मुख्यमंत्री असूनही माझ्या मागण्या पूर्ण होत नाहीत,” असा थेट अर्थ निघत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांच्या मागण्या पूर्ण करू शकत नसतील, तर राज्यातील सामान्य नागरिकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करतील, असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. अन् तसेही गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या आरोपांना शोभाताईंनी एकप्रकारे बळच दिले आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही.

Farmers’ ‘Prahar’ movement : हायवे जाम, नागरिकांचे हाल अन् आता घेतली सरकारने आंदोलनाची दखल !

शोभाताई फडणवीस यांनी यापूर्वीही पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका ठामपणे मांडली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केल्याचा सूर त्यांनी लावला आहे. त्यामुळे प्रशासन त्यांच्या हातात असूनही ते निष्क्रिय आहेत का, या प्रश्नाचे उत्तर राजकीय वर्तुळात शोधले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा संपूर्ण कार्यकाळ ‘फेलीवर’ जात असल्याच्या चर्चा राज्यभरात सुरू आहेत. त्यातच शोभाताईंनी हा बॉम्बगोळा टाकल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या गोटात हल्लकल्लोळ माजला आहे.

Moradabad case : मुरादाबाद प्रकरणानंतर महाराष्ट्रात चौकशी समिती कार्यरत !

शोभाताईंच्या या वक्तव्यात केवळ स्थानिक प्रशासनावरचा राग दिसत नाही, तर राज्य सरकारच्या धोरणांबद्दलचा खोलवरचा विरोधही झळकतो. ‘वन विभागातील काही निर्णय हे स्थानिक लोकांच्या हिताविरूद्ध आहेत आणि या विभागात गोंधळ, दुर्लक्ष आणि अनियमितता दिसते’, असा त्यांचा सूर आहे. त्यांच्या या थेट प्रश्नांमुळे आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ‘फडणवीस विरूद्ध फडणवीस’ हा सुरू झालेला संघर्ष राजकीय नाराजीचा संकेत आहे का?

Cyclone Montha: मोंथा चक्रीवादळाचा तडाखा; ताशी 100 किमी वेगाने सुटली हवा,

राजकीय विश्र्लेषकांच्या मते हा केवळ प्रशासनावरचा आक्षेप नाही, तर सत्तेतल्या अंतर्गत तणावाचं स्पष्ट प्रतिबिंब आहे. भाजपमध्ये असलेली नाराजी, निर्णय प्रक्रियेतील केंद्रीकरण आणि स्थानिक नेत्यांची उपेक्षा याकडे शोभाताईंच्या वक्तव्याने अंगुलीनिर्देश केला आहे. एकेकाळी भाजपच्या महिला नेत्यांमधील एक असलेल्या शोभाताई आता पुन्हा अॅक्टीव्ह मोडमध्ये आल्या आहेत. त्यांनी केलेल्या आरोपाकडे फक्त कौटुंबिक प्रतिक्रिया म्हणून हा विषय झटकणे शक्य नाही.

चक्काजाम आंदोलनात आमदार राजू बकाने अडकले

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारसाठी ही टीका घातक ठरू शकते. कारण घरातूनच उठलेल्या विरोधाच्या आवाजाने विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. शोभाताईंचा आवाज केवळ नाराजीचा नाही, तर सत्तेतील संतापाचा इशारा आहे. फडणवीस सरकारमधील विसंवाद उघडपणे दिसू लागला आहे. शोभाताईंच्या गोळीबारानंतर घर शांत राहिल का, की सत्तेतील हल्लकल्लोळ अजून पेटेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. फडणवीस घराण्यातील हा अंतर्गत विस्फोट राजकीय तापमान अजून किती वाढवणार, हेही पाहणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे.