Breaking

CM Devendra Fadnavis : नागनदीनंतर आता पोहरा नदीचे ‘मेकओव्हर’ !

Fadnavis’ efforts speed up Pohra river pollution elimination project : फड‌णवीसांच्या प्रयत्नांतून पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला गती

Nagpur नागपूर शहराच्या मध्य भागातून वाहणारी नागनदी प्रदूषित झाली आहे. शहरातील सांडपाणी या नदीमध्ये जात आहे. औद्योगिक आस्थापनांचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जात आहे. दुर्गंधीमुळे नदीच्या काठावरील वस्त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. मात्र आता नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राज्य व केंद्र सरकारने हाती घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र त्याचवेळी इतर छोट्या नद्यांचेही मेक-ओव्हर होणार आहे. यात पोहरा नदीचा आवर्जून समावेश होतो. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रयत्नांतून या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे.

पोहरा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे गती मिळाली आहे. अमृत-२ अंतर्गत शासनामार्फत मंजुरी मिळाल्यानंतर महापालिकेतर्फे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये सिवर लाईन बदलविण्याचे व नवीन सिवर लाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. सिवर लाईन टाकल्यानंतर रस्त्याच्या पुनर्भरणाचे कामही करण्यात येणार आहे.

Wardha Mahavitaran : महावितरणचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांना होतोय त्रास!

नेहरूनगर झोनमधील श्यामबाग वस्ती परिसरातील नवीन सिवर लाईन बदलवणे. हनुमाननगर झोनमधील शिवाजीनगर बेसा पॉवर हाऊस मागील भागातील नवीन सिवर लाईन बदलवणे. नरसाळा गारगोटी भागात नवीन सिवर लाईन टाकणे. आदी कामांचे निरीक्षण फडणवीस यांनी केले. सिवर लाईन बदलवण्याचे काम झाल्यानंतर रस्त्याचे योग्य पुनर्भरण व्यवस्थित व त्वरित करण्याचेही त्यांनी निर्देश दिले.

शिवाजीनगर बेसा पॉवर हाऊस मागील भागामध्ये अनेक घरांनी सिवर लाईनवरदेखील अनधिकृत बांधकाम केले आहे. याची माहिती विभागाद्वारे देण्यात आली. या भागातील नागरिकांना दीर्घकाळ सुविधा मिळावी यासाठी अनधिकृत बांधकाम तोडण्याचे निर्देश डॉ. चौधरी यांनी दिले. नरसाळा गारगोटी भागामध्ये लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसद्वारे नवीन सिवर लाईन टाकण्याचे काम केले जात आहे. या भागात प्रिकास्ट चेंबर बसविले जात आहे.

Wardha Mahavitaran : ३ हजार २०१ वीज ग्राहक पर्यावरणस्नेही

प्रिकास्ट चेंबरमुळे जलद गतीने उत्तम दर्जाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी आयुक्तांना देण्यात आली. प्रिकास्ट चेंबरच्या दर्जामध्ये कोणतीही कसूर न करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी दिले.