Said that history has answered those who banned RSS : म्हणाले संघावर बंदी घालणाऱ्यांना इतिहासानेच उत्तर दिलं
Bengaluru : कर्नाटकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.
राज्याचे ग्रामीण विकास आणि आयटी मंत्री प्रियांक खरगे यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून सरकारी शाळा, क्रीडांगणे आणि मंदिरांसारख्या सरकारी जागांवर आरएसएसच्या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना संपूर्ण बंदी घालण्याची मागणी केली.
या मागणीवर भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रियांक खरगेंना थेट लक्ष्य केलं आहे.“प्रियांक खरगे हे प्रसिद्धीसाठी असल्या गोष्टी करत असतात. संघावर बंदी घालणं हे फक्त राजकीय नाटक आहे,” असा टोला फडणवीसांनी लगावला.
प्रियांक खरगे यांनी पत्रात म्हटलं आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरकारी शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी शाखा घेऊन मुलं आणि तरुणांमध्ये फूट पाडणारे विचार पसरवत आहे. संघ संविधानविरोधी काम करतो आणि देशाच्या एकता व अखंडतेला धोका पोहोचवत आहे.
त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना अशा कार्यक्रमांवर संपूर्ण बंदी घालण्याची आणि चौकशी करण्याची मागणी केली आहे. यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
काँग्रेस सरकारकडून आलेल्या या पत्रानंतर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजप नेत्यांचं म्हणणं आहे की, हे सर्व लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीचं राजकारण आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी सुरू असलेला संघर्ष लपवण्यासाठी हा मुद्दा पुढे आणला जातो आहे.”
Local body election : ठाकरे बंधुंसोबत युती नको; काँग्रेस स्वबळावर लढणार!
या वादावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संघ ही देशभक्त संघटना, अशा पत्रांकडे आम्ही पाहतही नाही” कर्नाटकचे प्रियांक खरगे हे प्रसिद्धीसाठी असल्या गोष्टी करत असतात. ते वडिलांच्या भरवश्यावर राजकारण करत आहेत.
इंदिरा गांधींनीही संघावर बंदी घातली होती, पण त्याचे परिणाम काय झाले हे सगळ्यांना ठाऊक आहे.
संघ एक सांस्कृतिक, राष्ट्रभक्त आणि मूल्याधिष्ठित संस्था आहे. ती मानवनिर्मितीचं काम करते. अशा पत्रांकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही.”
Local body election : राज ठाकरे यांनाही काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा;
दरम्यान, प्रियांक खरगेंनी आपली भूमिका कायम ठेवत पुन्हा स्पष्ट केलं की, “आरएसएस खाजगी जागेत कार्यक्रम घेऊ शकते, पण सरकारी जमिनीवर आणि सार्वजनिक ठिकाणी बंदी घालावी. आरएसएसची विचारसरणी धोकादायक आहे. संविधानाच्या विरोधात काम करणाऱ्या संस्थेला सरकारी मदत किंवा जागा मिळू नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
______