Forged documents for birth registration, case registered against two in Yavatmal : नायब तहसीलदारांनी केलेल्या पडताळणीतून फुटले बिंग
Yavatmal : यवतमाळ तहसील कार्यालयात जन्माची नोंद नसलेल्या दोघांनी जन्माची नोंद करून दाखला देण्यात यावा, यासाठी प्रस्ताव सादर केला होता. तहसीलमध्ये आलेल्या दोन प्रस्तावांची नायब तहसीलदारांनी पुनर्पडताळणी केली असता, अर्जदारांनी बनावट कागदपत्रे जोडल्याचे उघड झाले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही प्रक्रिया जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ च्या कलम १३ (३) नुसार केली जाते. तालुका दंडाधिकारी यांच्या आदेशाने नोंद घेऊन जन्माचा दाखला देण्यात येतो. दोघांनी बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी यवतमाळ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध तक्रार देण्यात आली. त्यावरून बुधवारी रात्री गुन्हे दाखल झाले.
वाल्मिक महादेवराव मेंढेकार (वय ६०), रा. राधाकृष्णनगरी, लोहारा, शहना परवीन अब्दुल हक (७०), रा. नवरंग सोसायटी, पांढरकवडा रोड, यवतमाळ, अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील मेंढेकर यांनी २१ सप्टेंबर २०२३ मध्ये जन्म नोंदणीसाठीचा प्रस्ताव दाखल केला होता, तर शहना परवीन यांनी १९ डिसेंबर २०२४ ला प्रस्ताव यवतमाळ तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता.
बनावट जन्माच्या नोंदीचे प्रकरण राज्यात गाजत असताना पुनर्पडताळणी करण्यात आली. यामध्ये नायब तहसीलदार संजय गोरलेवार यांना या दोन्ही प्रस्तावात बनावट कागदपत्रे जोडल्याचे निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी बुधवारी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास केला जात आहे.
Fraud Birth-death records : ११ हजार जन्म-मृत्यूच्या नोंदणीचा लागणार Result!
जन्माची नोंद करत जन्म दाखला मिळविण्यासाठी खटाटोप केला जातो. हे राज्यातील काही जिल्ह्यांत घडलेल्या प्रकरणातून उघड झाले. अशा बनावट दस्तावेजांच्या आधारे नोंदी करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देशही शासन स्तरावरून देण्यात आले. त्यावरूनच जिल्हा प्रशासनाने जन्म-मृत्यूचे प्रस्ताव पुन्हा तपासण्यात यावे, असे निर्देश दिले होते.
Fake birth certificate case : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणी ९ गुन्हे दाखल, ५२ जण आरोपी
यवतमाळ तहसीलमध्ये डॉ. योगेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात अशा प्रस्तावाच्या पडताळणीचे काम करण्यात आले. या पडताळणीमध्येच दोन प्रस्तावाला जोडलेले कागदपत्र संयुक्त्तीक नसल्याचे आढळून आले. त्यानंतर थेट फौजदारी तक्रारीची कारवाई करण्यात आली आहे.








