Breaking

Fake school ID scam : वंजारी प्राथमिक शिक्षणाधिकारी असतानाच दिली होती बनावट आयडींना मंजुरी !

Wanjari had approved fake IDs while he was the Primary Education Officer of Nagpur Zilla Parishad : अटकेतील आरोपींची संख्या १२, दोघांना मिळाला जामीन

Nagpur : बनावट शालार्थ आयडी बनवून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. हा घोटाळा सध्या राज्यभर गाजत आहे. यामध्ये आतापर्यंत १२ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. प्रभारी शिक्षण उपसंचालक आणि शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणाच्या चौकशी समितीचे अध्यक्ष आणि नागपूर जिल्हा परिषदेचे तत्कालिन प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आलेली आहे. या कारवाईनंतर शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.

शालार्थ आयडी चौकशी समितीच्या अध्यक्षपदी राहिलेल्या अधिकाऱ्याविरूद्ध केलेल्या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. उपसंचालक कार्यालयातील तत्कालिन लिपीक लक्ष्मण मंगाम याला बुधवारी (ता. २१) अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेच चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली आहे. घोटाळ्यातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिस विभागाची एसआयटी आणकी काही लोकांना अटक, करेल अशी शक्यता आहे.

Nasik Politics : पालकमंत्रिपदाच्या वादात मला पडायचे नाही !

सन २०१९ पासून हा गोरखधंदा सुरू होता, असे आतापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे. चिंतामण वंजारी हे नागपूर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी असताना बनावट शालार्थ आयडींना मंजुरी देण्यात आली होती. या सर्व बाबी संगनमताने लपवून ठेवण्यात आल्या होत्या. वंजारी यांच्या अटकेनंतर आरोपींची संख्या १२ वर गेली आहे. कठोर कारवाई होत असल्यानं या प्रकरणातील मोठ्या माशांचे धाबे दणाणले आहे. आणखी काही जण पोलिस विभागाच्या एसआयटीच्या रडावर आहे, अशी माहिती एसआयटीचे प्रमुख, पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी आज (२३ मे) माध्यमांना दिली.