Farmer Suicide : पुरस्कार देता, म्हणून शेतीला पाणी देणार नाही का?

 

Farmers blocked the road to protest government policies : युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येचे पडसाद; बुलढाण्यात रास्ता रोको

Buldhana राज्य सरकारने कैलास नागरे यांना युवा शेतकरी पुरस्कार दिला. त्यांचं कौतुक केलं. राज्यभर त्यांच्या कार्याची महती पोहोचली. पण पुरस्कार दिला म्हणून शेतीला पाणी देणार नाही, असा नियम आहे का, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. अशात बुलढाण्यात रास्ता रोको करून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध नोंदवला.

देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा मंडळातील दुष्काळ सदृश गावांना शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी मिळावे, या मागणीसाठी लढा देणारे शिवनी आरमाळ येथील युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. १३ मार्च रोजी त्यांनी विष प्राशन करून जीवन संपवले. शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ही वेळ आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नागरे यांनी आत्महत्येपूर्वी चार पानी चिठ्ठी लिहून शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Farmer Suicide : पश्चिम विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या!

 

या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. अशात अंढेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू झाले. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभागी होऊन शासनाच्या चुकीच्या धोरणांचा तीव्र निषेध व्यक्त केला. अंढेरा मंडळातील १३ गावांना खडकपूर्णा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून कैलास नागरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. आंदोलनानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. परंतु प्रत्यक्षात पाणी न मिळाल्याने नागरे हतबल झाले. शेवटी त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

Farmer suicide case : युवा शेतकऱ्याच्या आत्महत्येने संतापाचा उद्रेक

“कैलास नागरे यांची आत्महत्या ही शासनाच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे. दुष्काळग्रस्त गावांना पाणी मिळाले, तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे आंदोलक शेतकऱ्यांनी म्हटले आहे. प्रशासनाच्या निर्णयांवर आक्षेप घेऊन त्यांनी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याचे संकेत दिले.

Farmer Suicide : होळीच्याच दिवशी युवा शेतकऱ्याची आत्महत्या!

रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला असून, अंढेरा फाट्यावर शेकडो वाहने अडवण्यात आली आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. कैलास नागरे यांच्या बलिदानानंतर प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहणार का? त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, याचा विचार सरकार करणार आहे का? असे सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.