Breaking

Farmer suicide : शेतकरी आत्महत्येचे थैमान, 3 महिन्यात 767 बळीराजांने मरणाला कवटाळले

Big crisis ahead for farmers in the state, death is cheaper than life : राज्यातील शेतकर्‍यांपुढे मोठे संकट, जगण्यापेक्षा मरण स्वस्त!

Mumbai : स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही बळीराजाचा कोणी वाली नसल्याचे चित्र कायम आहे. महाराष्ट्रात खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या 3 महिन्यात राज्यात 767 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. हा शासकीय नोंद झालेला म्हणजे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आहे. विदर्भात सर्वाधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. अमरावती विभागात आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे..

जानेवारी ते मार्च, या कालावधीत पश्चिम विदर्भात २५७ तर राज्यभरात ७६७ शेतकऱ्यांनी आमत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नुकतीच विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. राज्यात दिवसें दिवस शेतकरी आत्महत्या वाढत असून, पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांत तीन महिन्यांत २५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात यवतमाळमध्ये ८१, अमरावतीत ५०, अकोल्यात ४८, बुलढाण्यात ४२, वाशिममध्ये ३० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मराठवाड्यातील हिंगोलीतही आत्मत्यांचे सत्र सुरूच आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना निधी उपलब्ध करण्यासाठी सरकारची कसरत!

प्रत्येक महिन्यात पाच शेतकरी आत्महत्या करत आहेत, हे खरे आहे का? शिवाय या शेतकऱ्यांच्या वारसांना किती मदत केली असा प्रश्न डॉ. प्रज्ञा सातव, सतेज पाटील, भाई जगताप, राजेश राठोड, संजय खोडके, अमोल मिटकरी यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता. पश्चिम विदर्भात तीन महिन्यांत २५७ आत्महत्या झाल्या असून, राज्यभरात ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे लेखी उत्तरात सांगितले. पश्चिम विदर्भातील ७६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली आहेत तर ७४ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. १०७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती विधान परिषदेत देण्यात आली. राज्यात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यापैकी ३७३ प्रकरणे पात्र तर २०० प्रकरणे अपात्र ठरली. १९४ प्रकरणे प्रलंबित असून, ३२७ शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.