Breaking

Farmer Unique ID : ज्याच्या नावावर जमीन; त्यालाच युनिक आयडी!

15 thousand farmers got unique ID in Gondia District : गोंदिया जिल्ह्यात १५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

Gondia देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने युनिक फार्मर आयडी तयार करण्याची योजना आखली आहे. ११ कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे. ज्याच्या नावावर जमीन आहे, त्याच शेतकऱ्याला युनिक आयडी मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड, पीक विक्री आणि सुविधांचा लाभ घेता येईल. देशभरातील ११ कोटी शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत ओळखपत्राचे वितरण होणार आहे. या ओळखपत्रामध्ये शेतकरी आणि त्यांच्या शेतीसंबंधी माहितीचा समावेश असेल.

आतापर्यंत जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांना युनिक आयडी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ३९७ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. यापैकी ९३५२० शेतकऱ्यांची कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. तर १५ हजार शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांना युनिक आयडी वितरीत करण्यात आले आहे.

Chandrashekhar Bawankule, Ravindra Chavhan : ‘बावनकुळे सरांसोबत’ रवींद्र चव्हाण राज्याच्या दौऱ्यावर!

जमिनीची नोंद, गावाची नोंद, खतांचा वापर, पीक विम्यासंदर्भात महसूल खात्याकडून नोंदी केल्या जातात. तलाठी, मंडळधिकारी स्तरावरून या नोंदी होत असताना ‘फार्मर आयडी’ची जबाबदारीही महसूल विभागावरच सोपविण्यात आली आहे.

ओळखपत्र आधारशी लिंक केलेले असेल. तेच शेतकऱ्यांच्या जमीन नोंदींशी जोडले जाईल. या कार्डमध्ये शेतकऱ्यांच्या वैयक्तिक माहितीबरोबरच पेरणी केलेल्या पिकांची माहिती आणि जमिनीचा तपशील नोंदवला आहे. तसेच, आधारशी लिंक केल्यामुळे बँक डिटेल्स, पॅनचाही डेटा उपलब्ध होणार आहे.

FDI Policy : संघ प्रणित मजदूर संघाचा सरकारवर प्रहार!

आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असणारा मोबाइल नंबर, सातबारा व आठ अ दाखला, रेशन कार्ड ही कागदपत्रे शेतकऱ्यांना अर्जासोबत जोडायची आहेत. कृषी मंत्रालय शेतकरी आयडी कार्डच्या मदतीने शेतकरी नोंदणी तयार करणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल कृषी मिशनच्या अंतर्गत ॲग्रो स्टॅकचा हा भाग असेल. यासाठी यावर्षीच्या सुरुवातीस केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी मिळाली होती.