farmers affected by heavy rains : नियम धाब्यावर बसवून पंचनामे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचा संताप

Allegation of irregularities during the survey process : अनियमितता झाल्याचा आरोप, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Buldhana अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून शासनाने महसूल विभाग आणि कृषी खात्याला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. मात्र बिबी शिवारात पंचनाम्यांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप होत आहे.

तलाठी आणि कृषी सहाय्यकांनी नियम धाब्यावर बसवून पंचनामे केल्यामुळे शेकडो शेतकरी भरपाईपासून वंचित राहिले, असा आरोप अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी केला. इतकेच नव्हे तर अपात्रांना लाभ दिला गेला आणि पात्र शेतकरी यादीतून वगळले गेले, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

Smart Village : मुख्यमंत्री फडणवीसांकडून देशातील पहिल्या ‘स्मार्ट’ गावाचे उदघाटन

शेतकऱ्यांनी असा आरोप केला की, सर्वेक्षण प्रत्यक्ष बांधावर न करता कागदावरच पंचनामे करण्यात आले. त्यामुळे अनेक पात्र शेतकरी वगळले गेले. गरीब शेतकऱ्यांचे नुकसान असूनही त्यांना डावलण्यात आले, तर काही श्रीमंतांना लाभ मिळाला, असा गंभीर आरोप करण्यात आला.

पात्र लाभापासून वंचित शेतकऱ्यांनी थेट तलाठी कार्यालयावर धडक देऊन महसूल अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र अधिकाऱ्यांकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी खारवाल यांना दूरध्वनीद्वारे तक्रार केली आणि नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अन्यथा मोठे आंदोलन उभारू असा इशारा दिला.

Adivasi Pardhi Development Council : बीडममध्ये पारधी समाजावर अन्यायाचा कळस

या तक्रारीनंतर मंडळ अधिकारी खारवाल यांनी सर्व महसूल अधिकाऱ्यांना काटेकोरपणे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. मात्र, शेतकऱ्यांचा आक्रोश आणि प्रशासनातील अनियमितता यामुळे प्रकरण राजकीय रंग घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.