Farmers’ Economic Council : शेतकरी अर्थ परिषदेतून शेतकरी, शेतमजुरांची होणार एकजूट!

Farmers-to-raise-voice-against-the-farmers’-trade-agreement : जिल्हाभरातील शेतकरी राहणार उपस्थित; व्यापार कराराविरुद्ध उठविणार आवाज

Akola देशात अमेरिकन कृषीमाल मोठ्या प्रमाणात आयात होणार असल्याने भारतीय शेती, शेतकरी, शेतमजुरांवर उपासमारीची वेळ येणार आहे. हा करार शेतकऱ्यांसाठी डेथ वॉरंट असून या विरोधात जनजागृती करण्यासाठी आयोजित शेतकरी अर्थ परिषदेला शेतकरी बांधवांनी हजेरी लावून लोक लढ्याला बळकटी द्यावी असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी केले.

शेतकरी आसमानी व सुलतानी संकट आणि भरडला जात असताना बाजारपेठेतील अनिश्चितता, वाढते कर्ज, नैसर्गिक आपत्ती आणि हमीभावाचा अभावाने शेतकरी अडचणीच्या गर्ततेत आहे. यामध्ये भरीस भर भारत अमेरिका व्यापार करारामुळे शेती व्यवसाय, शेतकरी आणि शेतमजूर यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होणार होणार आहे.

Sarpanch administrator : मुदत संपलेल्या सरपंचांना प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाचा दणका!

शेती, शेतकरी, लोकशाही टिकवायची असेल तर शेतकऱ्यांनी एकजूट होणे गरजेचे आहे. याकरिता महात्मा फुले आयुर्वेदिक महाविद्यालय, मूर्तिजापूर रोड, बाभुळगाव येथे रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी सकाळी 10:30 वाजता ही शेतकरी अर्थ परिषद घेण्यात येणार आहे.या शेतकरी परिषदेला जिल्हाभरातून 3 हजार पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित राहणार असून शेतकऱ्यांच्या हितासाठी आगामी काळात उचलल्या जाणाऱ्या ठोस पावलांवर विचार मंथन करण्यात येणार आहे.

WCL : कोळसा काढल्यावर कचऱ्यात आढळले दुर्मिळ धातू!

या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. मुकुल वासनिक, अखिल भारतीय किसान काँग्रेस अध्यक्ष सुखपाल शिंग खैरा, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कृषी व ग्रामीण अर्थ व्यवस्थेचे अभ्यासक व तज्ञ मिलिंद मुरुगकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, देशोन्नतीचे संपादक शेतकरी नेते प्रकाश पोहरे, अकोला पश्चिम विधानसभेचे आमदार साजिद खान पठाण यांची उपस्थिती लाभणार आहे.

Chandrashekhar bawankule : होळीच्या दिवशी भूमिहीन शेतकरी करणार महसूलमंत्र्यांच्या घरासमोर शिमगा

ही शेतकरी परिषद केवळ शेतकरी, शेतमजूर व शेतीवर अवलंबून असलेल्या नागरिकांसाठी महत्त्वाची आहेच, सोबतच देशातील नागरिकांच्या भवितव्यासाठी महत्त्वाची पर्वरी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शेतकरी संघटना, नागरिक व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येऊन या प्रश्नावर व्यापक जनआंदोलन उभारावे, असे आवाहन काँगेस पक्षातर्फे करण्यात आले.