Farmers’ fight for debt relief : बच्चू कडू यांनी उलगडले ३० जूनच्या मुदतीमागचे गुढ !

Bachchu Kadu reveals the secret behind the June 30 deadline : सरकारची व्यूहरचना भेदत शेतकऱ्यांना दिला दिलासा

Nagpur : राज्यातील प्रत्येक गरजू आणि पात्र शेतकरी कर्जमुक्त होईल, अशी ऐतिहासिक घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं महाएल्गार आंदोलन अखेर यशस्वी ठरलं अन् सरकारने ३० जून २०२६ पर्यंतची मुदतवाढ जाहीर करत कर्जमाफिचा मार्ग मोकळा केला आहे.

जर आजच कर्जमाफी जाहीर केली असती, तर फक्त २०१९ ते २०२४ या कालावधीतील थकीत कर्जदारांनाच लाभ मिळाला असता. पण अतिवृष्टी, उत्पादन खर्च आणि अडचणींमुळे अलीकडच्या काळातही हजारो शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे ३१ मार्चनंतर थकबाकी होणारे शेतकरीसुद्धा कर्जमाफीच्या कक्षेत येतील. त्यासाठीच कर्जमाफीसाठी ३० जून ही तारीख ठरवण्यात आलेली आहे, असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं.

Bachchu Kadu : शरद जोशींनंतर पहिल्यांदाच एकवटला शेतकऱ्यांचा महासागर !

 

अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून सुरू झालेल्या ट्रॅक्टर मोर्चाने अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत नागपूरच्या वेशीवर धडक दिली. लाखो शेतकऱ्यांच्या या लाटेने सरकारला अक्षरशः धडकी भरली. आंदोलनाचे उग्र रुप पाहून राज्य सरकारकडून राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल यांना तातडीने बच्चू कडुंच्या भेटीसाठी पाठवण्यात आलं. पण बच्चू कडुंनी ठाम भूमिका घेत सागितलं की कर्जमाफीची तारीख आणि धोरण स्पष्ट झाल्याशिवाय वाटाघाटी होणार नाहीत.

Sikander Sheikh : सिकंदर शेख ‘महाराष्ट्र केसरी’ ते शस्त्रांची तस्करी!

सरकारच्या या निर्णयानंतर बच्चू कडुंनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय झाला म्हणून आम्ही थांबलोय. आंदोलन स्थगित झाले आहे, रद्द नाही. सरकारने शब्द पाळला नाही तर पुन्हा रस्त्यावर उतरू. हा विजय फक्त माझा नाही, तर राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्याच्या घामाचे मोल सरकारची धोरणे ठरवतात आणि आम्ही ती धोरणे बदलवणारच. जेव्हा शेतकरी झोपतो, तेव्हा सरकार सुखात असते. पण जेव्हा शेतकरी उठतो, तेव्हा सरकार फक्त जागे होत नाही, तर हादरते, हे आमच्या आंदोलनाने दाखवून दिलं आहे.