Farmers incrisis : शेतकरी संकटात! मदत कधी ? कर्जमाफी कधी?

Important information from Deputy Chief Minister Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती

Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. शेतकरी संकटात सापडला असताना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली.

शिंदे म्हणाले की, “राज्यातील अनेक भागात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. पंचनामे युद्धपातळीवर केले जात आहेत.”

Wet drought : अतिवृष्टीचा तडाखा, २,२१५ कोटींची मदत मिळणार !

शिंदे यांनी स्पष्ट केले की, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पंचनामे पूर्ण होताच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. “दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेल,” असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर जाणार असून, शिंदे स्वतः धाराशिवला जाणार आहेत. राज्यातील इतर मंत्रीही पाहणीसाठी वेगवेगळ्या भागात जाणार आहेत.

Electricity on highway : देशात पहिल्यांदाच हायवेवर वीज निर्मिती

कर्जमाफीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, “सरकार याबाबत गंभीर आहे. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत आणि दोन्ही सरकारांकडून मदत केली जाईल. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.”
शिंदे यांनी सांगितले की, पूरग्रस्त भागांमध्ये जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत. यात पीठ, कपडे, भांडी, औषधे आणि साड्यांचा समावेश आहे. तसेच पावसामुळे साथीचे आजार होऊ नयेत म्हणून आरोग्य विभाग सतर्क आहे.

___