व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Farmers loan waiver : कर्जमाफीच्या प्रक्रियेत अडकले नवे कर्ज, वाटपावर होणार परिणाम

Farmers loan waiver : कर्जमाफीच्या प्रक्रियेत अडकले नवे कर्ज, वाटपावर होणार परिणाम

New crop loans stuck in the loan waiver process : खरीप हंगामापूर्वी पीक कर्ज वितरण सुरू करण्याची मागणी

Khamgao यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाच्या वाटपात विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या दोन लाखांपर्यंतच्या पीक कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी समितीच्या अहवालानंतरच वेग घेणार असल्याने, नवीन पीक कर्ज वितरणावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप सुरू झालेली नाही. तांत्रिक पातळीवरील प्रक्रिया सुरू असून, सरकारने नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल एप्रिलअखेरीस अपेक्षित आहे. हा अहवाल उशिरा आल्यास नवीन पीक कर्ज वितरणही पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्जमाफी प्रक्रिया अद्याप अंतिम टप्प्यात नसल्याने नवीन पीक कर्ज वितरणात विलंब होण्याची शक्यता आहे. यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असून, पीक कर्ज उशिरा मिळाल्यास बियाणे, खते आणि मशागतीच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Khamgao municipal council : करवाढीला अखेर ब्रेक ; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दालनात होणार सुनावणी

राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची स्थिती, कर्जरचनेचे स्वरूप, बँकांचा सहभाग आणि कर्जमाफीचा एकूण आर्थिक परिणाम यांचा सखोल अभ्यास करणे समितीसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे अहवाल तयार होण्यास अधिक वेळ लागू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच बँकांकडून नवीन पीक कर्जाचे वितरण सुरू होण्याचे संकेत आहेत.

Farmers loan waiver : आठ वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्यांना न्याय; ४८.३४ कोटींची कर्जमाफी

कर्जमाफी योजनेचे अंतिम स्वरूप अद्याप स्पष्ट न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि धास्तीचे वातावरण आहे. यापूर्वीच्या योजनांमध्ये अनेक अटी व शर्ती लागू झाल्याने अनेक शेतकरी पात्र ठरू शकले नव्हते. यंदाही कठोर निकष लागू होण्याची शक्यता असल्याने लाभ मिळेल की नाही, याबाबत शेतकरी अनिश्चिततेत आहेत.

error: Content is protected !!