Gajanan Maharaj Shegaon Sansthan Steps Forward to Help Flood Victims : मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी ११ लाख दिले
Nagpur : यावर्षी महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडाला आहे. विदर्भासह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात सतत झालेल्या अतिवृष्टीने ग्रामीण भागात घरांच्या पडझडीसह शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मंत्री बांधावर फिरत आहेत. तातडीने पंचनामे करून अतिवृष्टीग्रस्तांना मदत देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. अशात धार्मिक संस्थाही मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.
शिर्डीचे साईबाबा संस्थान, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर संस्थान, मुंबईतील लालबागचा राजा गणेश मंडळाने पूरग्रस्तांना याआधीच मदत जाहिर केली आहे. आता पश्चिम विदर्भातील संत गजानन महाराज संस्थानही अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. शेगाव संस्थानने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी ११ लाख रुपयांचा निधी सुपूर्द केला आहे. शेगाव संस्थानचा सेवा हाच धर्म आहे. स्वच्छता आणि शिस्तीच्या बाबतीत हे संस्थान देशातच काय तर जगात क्रमांक एकचे मानले जाते.
Special Session : विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी !
विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या आणि धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या संत गजानन महाराज संस्थानच्या न्यासमार्फत या निधीचा धनादेश नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. या संस्थेने अतिवृष्टीग्रस्तांना भरीव मदत देऊन सेवाकार्यासोबतच सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे.
Asia Cup 2025 : निर्लज्जपणाचा कळस ! टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळाला मोहसीन नक्वी !
महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड होण्यासह शेतींचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी जमीन खरवडून निघाली आहे. सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान सरकारने धार्मीक संस्थांनाही मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शिर्डीचे साईबाबा संस्थान, तुळजापूरचे तुळजाभवानी संस्थान आणि शेगावच्या संत गजानन महाराज संस्थाने भरीव मदत दिली आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.








