व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home ताज्या बातम्या Farmers Protest : मोर्चेकरी अर्धनग्न पोहोचले सरकारी कार्यालयात, ‘डफडे’ आंदोलन

Farmers Protest : मोर्चेकरी अर्धनग्न पोहोचले सरकारी कार्यालयात, ‘डफडे’ आंदोलन

Benefits of PM-Kisan Samman Nidhi pending for 115 farmers : शेतकरी सन्मान योजनेचा ११५ शेतकऱ्यांचा लाभ थकला, मेहकर कृषी विभागाविरोधात असंतोष

Mehkar तालुक्यातील शेकडो शेतकरी शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून अनेक वर्षांपासून वंचित असल्याच्या निषेधार्थ मेहकर येथील कृषी विभागाच्या गलथान कारभाराविरोधात अर्धनग्न व डफडे बजाव आंदोलन करण्यात आले. आंदोलन सम्राट गजानन बोरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली.

आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी अंगाला बेशरम व लिंबाच्या पानांचा वेष परिधान करून अर्धनग्न अवस्थेत, डफडे वाजवत आणि घोषणाबाजी करत कृषी विभागाच्या कार्यालयाकडे मोर्चा काढला. जिजाऊ चौक मार्गे निघालेल्या या मोर्चात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

corporators’ suspension decision : नगरसेवक निलंबन प्रकरणावर विरोधक आक्रमक; प्रधान सचिवांकडे अपील दाखल

तालुका कृषी अधिकारी अनेकदा कार्यालयात अनुपस्थित असतात, तर कर्मचारीही शेतकऱ्यांशी असहकार्याची भूमिका घेतात. अनेक अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांनी शेतकरी सन्मान योजनेसाठी अर्ज करूनही वर्षानुवर्षे केवळ कागदी पूर्ततेच्या नावाखाली त्यांना फिरवले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या शेतकरी हिताच्या योजना स्थानिक पातळीवरच निष्प्रभ होत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

कृषी विभागाच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या देत जोरदार घोषणा दिल्या. अखेर प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल घेत ११५ शेतकरी लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे दुरुस्त करून १६ एप्रिलपर्यंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांच्याकडे सादर करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिले.

Nagpur police : सेंट्रल एव्हेन्यूवर ‘डिटोनेटर’ सापडल्याने खळबळ; दंगलीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा संशय?

तसेच संबंधित प्रगतीची माहिती आंदोलनकर्त्यांना लेखी स्वरूपात देण्याचेही मान्य करण्यात आले. या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असले, तरी मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या काळात अधिक तीव्र ‘टॉवर आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशारा गजानन बोरकर यांनी दिला.

error: Content is protected !!