Farmers’ struggle : बच्चू कडुंवरच उलटला त्यांचा ‘प्रहार’, शेतकऱ्यांचा विश्र्वासघात की रणनितीचा विजय?

 

Their ‘attack’ backfired on Bachchu Kadu : आंदोलन नागपुरात, तह मात्र मुंबईत; सरकारने दिलेल्या गाजरावरून संताप

Nagpur : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्र्नावर उभं राहिलेलं बच्चू कडू यांचं महाएल्गार आंदोलन आता वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. नागपुरात सुरू असलेले आंदोलन मुंबईत तह करून संपवल्याने काही शेतकऱ्यांच्या भावना भडकल्या आहेत. फडणवीस सरकारने ३० जून २०२६ ही कर्जमाफीची तारीख जाहीर करून आणि नऊ सदस्यीय समिती गठीत करून आंदोलन तर थांबवले. पण या निर्णयावर शेतकरी संघटनांकडून आणि समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या एका निरोपावर बच्चू कडू आंदोलनातून माघार घेतात आणि मुंबईत तहाला बसतात, हा आरोप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. ३१ मार्चपूर्वी उद्धवस्त झालेला शेतकरी बॅंकांचे हप्ते कसे फेडणार, असा सवाल शेतकरी नेते आणि नागरिक आता विचारू लागले आहेत. मनोज जरांगे पाटलांनीदेखील बच्चू कडुंच्या भूमिकेवर टीका केली आहे. ३० जूनपर्यंत कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करण्यासारख आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सरकारने नेमलेल्या नऊ सदस्यीय समितीवरही शंका व्यक्त होत आहे.

Farmers’ fight for debt relief : बच्चू कडू यांनी उलगडले ३० जूनच्या मुदतीमागचे गुढ !

पुन्हा हवामहल चर्चेत..
८४ हजार कोटींच्या शक्तिपीठ महामार्गासाठी किंवा सुरजागडच्या प्रकल्पासाठी समिती लागली नाही, मग शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्यासाठीच का समिती लागली, असाही प्रश्र्न केला जात आहे. सरकारसोबत तह झाल्यानंतर बच्चू कडुंवरील जुने आरोप पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांनी त्यांच्यावर खंडणी, जमीन बळकावणे आणि हवामहल बांधण्यासाठी गरीबांच्या जमिनी लाटल्याचे गंभीर आरोप केले होते. वंचित बहुजन आघाडीकडूनही अकोल्यातील रस्ते निधी अपहार प्रकरणी कडू दोषी असल्याचा दावा करण्यात आला होता.

Bachchu Kadu : शरद जोशींनंतर पहिल्यांदाच एकवटला शेतकऱ्यांचा महासागर !

राजकीय समिकरणांचा नवा खेळ..
बच्चू कडू यांचे आंदोलन फडणवीस प्रायोजित होते. सरकारला हिवाळी अधिवेशनात त्यांच्याकडून निर्माण होणारी डोकेदुखी टाळायची होती. म्हणून तहाची ऑफर देऊन आंदोलन संपवण्यात आले, असा काही शेतकरी नेत्यांचा आरोप आहे. हा शेतकऱ्यांचा नव्हे तर सरकार आणि कडुंच्या व्यवहाराचा तह आहे, असे किशोर तिवारी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

जरांगेंची टीका..
मनोज जरांगे यांनी बच्चू कडुंवर टीका करताना सरकारवरही प्रहार केला. जरांगे मंत्रालयात गेले नाहीत. तर सरकार त्यांच्या आंदोलनस्थळी आलं. पण बच्चू कडू मंत्रालयात गेले, म्हणजेच त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, असे जरांगे यांनी म्हटलं आहे.