Female Doctor Commits Suicide : पोलिसच असे बलात्कार करत सुटले तर..!

Former Home Minister Anil Deshmukh Says, Devendra Fadnavis Should Take Notice : यापेक्षा गंभीर काहीही नाही, गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी

Nagpur : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महिला डॉक्टरवर पोलिस अधिकाऱ्यांना बलात्कार केला, असा आरोप महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये केला आहे. त्याचाच सहकारी असलेल्या दुसऱ्या पोलिस अधिकाऱ्याने या महिला डॉक्टरचा मानसिक छळ केला. तिने तक्रार केल्यानंतरही काहीच कारवाई न झाल्याने अखेर तिने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. हा विषय अतिशय गंभीर आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते अनिल देशमुख यांनी केली.

यासंदर्भात आज (२३ ऑक्टोबर) नागपुरात पत्रकाराशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, हा विषय गंभीर आहे. एका महिला डॉक्टरवर पोलिस अधिकारी बलात्कार करतो आणि त्या महिलेला आत्महत्या करावी लागते. अशा पोलिसांवर यंत्रणेचे नियंत्रण पाहिजे. नाहीत अशा लोकांची हिंमत वाढतच जाईल. अशा घटनांमध्ये पोलिस स्वतः सहभागी आहेत, तर त्याची दखल गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. याच्याशिवाय दुसरा कुठलाही गंभीर विषय नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांनी दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.

Doctor suicide case : साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्येने महाराष्ट्र हादरला

रविंद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या सुरू असलेल्या वादावरसुद्धा अनिल देशमुख यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय स्वतः समजून घेतला पाहिजे. मोहोळ आणि धंगेकर यांचं काय म्हणणं आहे, हेही ऐकून घेतलं पाहिजे. जैन समाजाची जी मागणी आहे, ती मुख्यमंत्र्यांनी स्वतः समजून घेऊन दोन्ही बाजू ऐकून योग्य निर्णय घेतला पाहिजे.