Competition for women’s Maharashtra Kesari at Deoli in Wardha district : वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे महिला महाराष्ट्र केसरीसाठी स्पर्धा
Wardha : वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे महिला महाराष्ट्र केसरी तसेच राज्यस्तरीय महिला अजिंक्य कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी (२४ जानेवारी) रात्री पार पडले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते माजी खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला.
स्पर्धेच्या उद्घाटनाला आमदार राजेश बकाने, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी आमदार दादाराव केचे, आरती वानखेडे, माजी नगराध्यक्ष शोभा तडस, वैशाली येरावार, मुंबई केसरी आभा काळे, विदर्भ केसरी संजय तिरथकर, मुख्याधिकारी विजय आश्रमा उपस्थित होते. सलामीला महिला केसरीच्या कुस्त्यांची सोडत मंत्री. उईके, माजी खासदार तडस, आमदार बकाने यांच्या हस्ते काढण्यात आली.
Psychiatric center : विनापरवानगीने सुरू होते निवासी मानसोपचार केंद्र !
सलामीच्या कुस्त्या भाग्यश्री फंड (पुणे जिल्हा) विरुद्ध सिद्धी होळकर (पुणे शहर) आणि अमृता पुजारी (कोल्हापूर) विरुद्ध ज्योती यादव (जळगाव) यांच्यात झाली. या दोन्ही लढती अतिशय दर्शनीय ठरल्या. देवळीच्या विदर्भ केसरी रामदास तडस इनडोअर स्टेडियममध्ये बजरंग व्यायामशाळा व वर्धा जिल्हा कुस्तीगीर संघाच्यावतीने महाराष्ट्र केसरी कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आले आहे.
Zilla Parishad school : मानधन मिळेपर्यंत शिक्षक रजेवर, विद्यार्थी वाऱ्यावर !
महिला केसरी तसेच राज्य अजिंक्य कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून २०० महिला पहेलवानांनी हजेरी लावली आहे. त्यात महिला महाराष्ट्र केसरीसाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर, जळगाव, नाशिक, रायगड, सातारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, वर्धा आदी ठिकाणच्या १२ पहेलवानांचा सहभाग आहे. त्यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा २५ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होईल. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ अध्यक्षस्थानी राहतील. राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार राजेश बकाने यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कुस्तीचे पंच म्हणून दिनेश गुंड, नितीश काबलीय, संभाजी निकासे, रणवीर राहाल आदी काम पाहत आहे.