Another fetus found in the womb of a pregnant woman : वैद्यकीय क्षेत्रातील दुर्मिळ घटना; भारतातील १५ वे प्रकरण
Buldhana वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत दुर्मिळ मानली जाणारी घटना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली आहे. ३२ वर्षीय गर्भवती महिलेच्या गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे निदान झाले असून, या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘फीटस इन फीटू’ असे म्हणतात. जगभरात ५ लाख प्रकरणांमागे केवळ एकाचवेळी अशी घटना आढळते. या महिलेच्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक तज्ज्ञ उपचारांसाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील एका गर्भवती महिलेने दोन दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हजेरी लावली. डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी केल्यानंतर धक्कादायक निष्कर्ष समोर आला. सोनोग्राफी करणारे डॉ. प्रसाद अग्रवाल यांनी निरीक्षणादरम्यान वारंवार तपासणी केली आणि निष्कर्षांची खातरजमा केली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने आणि स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांना या घटनेची माहिती दिली.
Illegal sale of biodiesel : मुंबई दक्षता पथकाची मलकापुरात मोठी कारवाई
तपासणीत महिलेच्या गर्भात आणखी एक गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. हा गर्भ सुमारे ३५ आठवड्यांचा आहे. त्यामध्ये काही हाडे आणि गर्भासारखी रचना स्पष्ट दिसत आहे. महिलेच्या गर्भधारणेचा कालावधी नऊ महिने पूर्ण झाल्याने आणि संभाव्य धोका लक्षात घेऊन तिला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. तेथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिची प्रसूती केली जाणार आहे.
भारतातील १५ वी घटना
‘फीटस इन फीटू’ ही स्थिती जगभरात अत्यंत दुर्मिळ आहे. पहिली घटना १९८३ मध्ये समोर आली होती. आतापर्यंत अशा २०० हून अधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. भारतात मात्र ही केवळ १५ वी घटना असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.