Breaking

Fetus in Fetu : इवल्याशा जीवाच्या पोटात सापडली दोन अर्भके!

Two babies were found in the stomach of newborn : दुर्मिळ घटना! डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया

Amravati बुलढाण्यातून आणलेल्या तीन दिवसांच्या नवजात बाळाच्या पोटातून पुरुष जातीची दोन अर्भके बाहेर काढण्यात आली. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास अमरावतीतील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने ही दुर्मीळ आणि जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली. शस्त्रक्रियेनंतर बाळ सुखरूप असल्याची खात्री पटताच, डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

बुलढाण्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात १ फेब्रुवारी रोजी ३२ वर्षीय महिलेची सिझेरियन प्रसूती करण्यात आली. मात्र, नवजात बाळाच्या पोटात गर्भ असल्याचे निदान झाल्यानंतर त्याला रविवारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) हलवण्यात आले. आवश्यक तपासण्या पूर्ण करून मंगळवारी सकाळी १० वाजता शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. तब्बल दीड तासांच्या या शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पोटातून पुरुष जातीची दोन मृत, अर्धविकसित अर्भके बाहेर काढण्यात आली.

Mumbai Municipal Corporation : श्रीमंत महापालिकेचा ७४, ४२७.४१ कोटींचा अर्थसंकल्प!

पाच लाखांमधून एखाद्या नवजात बाळामध्ये आढळणाऱ्या या प्रकाराला वैद्यकीय भाषेत ‘Fetus in Fetu’ म्हणतात. बाळाच्या पोटातून काढलेली दोन्ही अर्भके पुरुष जातीची होती. डोके वगळता त्यांचा काही प्रमाणात विकास झाला होता. ही अर्भके बाळाच्या गर्भजलामध्ये होती.

पहिल्या अर्भकाचे वजन २५० ग्राम तर दुसऱ्याचे ५० ग्राम आहे. शस्त्रक्रियेनंतर बाळाच्या पोटाला १२ टाके पडले आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ. उषा गजभिये, डॉ. नवीन चौधरी, डॉ. नितीन बरडिया, डॉ. नीलेश पाचबुद्धे, तसेच बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. संजय महतपुरे यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.

Nagpur Congress : काँग्रेस पदाधिकाऱ्याची फसवणूक; आरोपीही काँग्रेसचेच

परिचारिका विद्या चुडे, पुष्पा घागरे, मनीषा राऊत, एलिझा तेलगोटे, ज्योती गोंडसे, तसेच अटेंडंट सुधीर मोहोड आणि अर्चना दंबाले यांनीही शस्त्रक्रियेदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावली.