Breaking

Field Testing Kit : दीड हजार गावांमधील पाण्याची होणार तपासणी!

Water of villeges in Nagpur District will be tested : फिल्ड टेस्टिंग किटच्या माध्यमातून मोहिमेला शुभारंभ

Nagpur राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक व जैविक गुणवत्ता तपासण्यासाठी १२ मे ते ७ जून या कालावधीत ‘फिल्ड टेस्टिंग किट’च्या साहाय्याने जिल्ह्यातील दीड हजार गावांत पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या उपस्थितीत पार पडला. जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या मोहिमेत गावात निवड करण्यात आलेल्या पाच महिलांची एफटीके प्रशिक्षणानंतर पाणी तपासणीसाठी नियुक्ती केली जाईल. शाळा, अंगणवाडी, घरगुती नळ आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी महिलांमार्फत केली जाणार आहे, ज्यामुळे महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

Vidarbha Farmers : सरसकट कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक

‘फिल्ड टेस्टिंग किट’ हे एक साधन आहे. पिण्याच्या पाण्यातील रासायनिक व जैविक गुणधर्म त्वरित तपासण्यासाठी वापरले जाते. यामुळे गावपातळीवरच दूषित पाणी ओळखणे शक्य होते. ८वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना एफटीके किटद्वारे प्रात्यक्षिक करून दिले जाईल. त्यामार्फत पाणी नमुन्यांची तपासणी, नोंदीकरण आणि स्थानिक जनतेमध्ये जनजागृती केली जाईल.

MLA Siddarth Kharat : आमदाराने तलवार फिरवली, पोलिसांनी गुन्हा दाखल केला!

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कुमुदिनी श्रीखंडे हाडोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, कार्यकारी अभियंता उमल चांदेकर, प्रकल्प संचालक कुणाल उंदीरवाडे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.