Fire in Malkapur : मलकापूरात भीषण आग; ५० लाखांचे नुकसान

14 four wheelers burnt in Malkapur : 14 चारचाकी खाक; नियंत्रण मिळवायला लागले दोन तास

Buldhana मलकापूर शहरातील बुलढाणा रस्त्यावरील मधुबन नगरात असलेल्या सानिया कार केअर गॅरेजला २० जानेवारी रोजी पहाटे भीषण आग लागली. या आगीत १४ चारचाकी गाड्या आणि ५० लाखांचे स्पेअरपार्ट जळून खाक झाले. ही आग इतकी गंभीर होती की दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतरच ती नियंत्रणात आणता आली.

ही आग एवढी भीषण स्वरूपात होती की, आगीचे डोंब मजल दरमजल वाढतच होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी जमलेल्या लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु, तब्बल दोन तास आग आटोक्यात आली नाही. अखेर घटनास्थळी उपस्थित असलेल्यांपैकी काहींनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला ह्या घटनेची माहिती दिली.

Aditya Thackeray : मुख्यमंत्री दावोसला गेले, पण उपमुख्यमंत्री नाराज होऊन गेले कुठे ?

आगीची घटना आणि हानी
मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे गॅरेजचे संचालक मोहम्मद इमरान शेख छोटू (रा. ताजनगर) हे घरी गेले होते. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मंगेश मेंढे यांनी त्यांना आगीबाबत माहिती दिली. गॅरेजमधील दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १४ गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्या. याशिवाय, स्पेअरपार्ट व गॅरेज शेडचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाची कामगिरी
आगीचा प्रसार एवढा वेगवान होता की घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीनंतरही आग आटोक्यात येत नव्हती. अखेर नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्निशमन प्रमुख वासुदेव भोपळे आणि त्यांच्या पथकाने चौफेर पाण्याचा वर्षाव करून आग आटोक्यात आणली.

Indian Constitution : भारतीय राज्यघटनेमुळेच भारत शक्तिशाली राष्ट्र !

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
या घटनेनंतर मोहम्मद इमरान शेख छोटू यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू आहे.
ही आग स्थानिकांसाठी धक्कादायक ठरली असून, परिसरात खळबळ उडाली आहे़ अग्नीशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने माेठा अनर्थ टळला.