Breaking

Flood situation : ‘समृद्धी’लाही बसला मुसळधारेचा फटका, रस्त्याची झाली नदी !

Samruddhi Highway hit by heavy rain, two people died : हजारो प्रवाशांची गैरसोय, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे २५ जूनच्या सायंकाळपासून धो धो पाऊस बसरतो आहे. यामुळे मेहकर आणि लोणार तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. समृद्धी महामार्गाला या पावसाचा फटका प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बसला आहे. समृद्धी महामार्गावरील मेहकर इंटरचेंज टोल नाक्यावर जाण्यासाठी असलेला रस्ता पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे. इतका की येथे रस्ता असेल, याची कल्पनाही येत नाही. या रस्त्याला नदीचे स्वरुप आले आहे.

२५ जूनच्या सायंकाळपासून जवळपास विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस सुरू आहे. मेहकर येथे तर पावसाने थैमान घातले आहे. मेहकरमध्ये समृद्धी महामार्गावर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी असलेल्या रस्त्याला सतत बसरणाऱ्या मुसळधार पावसाने नदीचे स्वरुप आले आहे. त्यामुळे येथून समृद्धी महामार्गावर चढणे आणि उतरणे बंद झाले आहे. याचा फटका हजारो प्रवाशांना बसलेला आहे. इतक्यात तरी पुराचे पाणी ओसरेल, अशी स्थिती नाहीये.

Hindi Language Conflict : हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र!

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सततच्या पावसाने दोघांचा जीव गेला आहे. लोणार तालुक्यातील बीबी येथे एक युवक पुरात वाहून गेल्याची माहिती आहे. तो याच मार्गावरील एका हॉटेलमध्ये कामाला असल्याचे सांगण्यात येते. हॉटेलच्या कामाने तो बाहेर गेला असता हा युवक पुरात वाहून गेल्याची माहिती आहे. दुसऱ्या एका घटनेत मेहकर तालुक्यातील शेंदला येथे एका महिलेचा मृत्यू झाला. आशा लोंढे असे त्या मृत महिलेचे नाव आहे. सततच्या पावसाने त्यांच्या घराची भिंत कोसळ्याने मलब्याखाली दबून त्या जागीच दगावल्याचे सांगण्यात आले आहे.

Congress State President Harshawardhan Sapkal : इंदिरा गांधींनी पराभव पत्करला, पण मतांची चोरी केली नाही !

बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाल्यांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. नुकत्याच झालेल्या पेरण्याही या पुरात वाहून गेल्या आहेत. यामध्ये मेहकर तालुक्याला ज्यादा फटका बसला आहे. सततच्या पावसाने शेगाव-पंढरपूर पालखी मार्गावरील वाहतुकही ठप्प झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.