Battle for Municipalities, Panchayats and Gram Panchayats : जिल्हा परिषदेत खुर्ची बदल; पालिका, पंचायती व ग्रामपंचायतींसाठी घमासान
Gondia Battle for Chair स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 2024 मध्येही रखडली. गत दोन ते अडीच वर्षांपासून या संस्था पदाधिकाऱ्यांविना आहेत. आता हे वर्षदेखील सरले. त्यामुळे येत्या नवीन वर्षांत ‘नवा गडी, नवा राज’ येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह विषय समिती सभापतींचीही खुर्ची बदल होणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष कुणासाठी आनंदाची पर्वणी घेऊन येणार, हे बघावे लागणार आहे.
गेल्या अडीच ते तीन वर्षांत राज्यातील राजकारण Politics बरेच काही शिकवून गेले. कुणी विकासाच्या नावावर, तर कुणी धर्माचे नाव घेऊन स्वतःच्या पक्षाशीच फारकत घेतली. पक्षांमध्ये फोडाफाडी झाली. त्यानंतर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद या चारही आयुधांचा वापर करीत मैदानात उतरल्याचे दिसून आले.
गोंदिया Gondia जिल्ह्याला दोन खासदार लाभले. गडचिरोली-चिमूर आणि भंडारा-गोंदिया हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ यापूर्वी भाजपकडे होते. मात्र राज्यातील अडीच वर्षांपूर्वी झालेल्या सत्ताबदलानंतर महाआघाडीला मतदारांनी कौल देत दोन्ही खासदार काँग्रेसच निवडून दिले. त्यानंतर अगदी काहीच महिन्यांत विधानसभा निवडणूक लागली. महाआघाडीला पुन्हा आपलीच सत्ता राज्यात येईल, असे वाटू लागले होते.
Nagpur Zilla Parishad : जिल्हा परिषद सदस्यांना आक्षरण बदलाचा बसणार फटका?
काँग्रेसचा Congress गड समजला जाणारा गोंदिया मतदारसंघ सहा दशकानंतर आपल्याकडे खेचून घेतला तर चारपैकी एकाही मतदारसंघ महाआघाडीला जिंकता आले नाही. आता मात्र गटग्रामपंचायत, नगर पंचायत आणि नगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या संस्थादेखील आपल्याकडेच राहाव्यात, यासाठी आतापासून राजकीय पक्षांनी फिल्डिंग लावली आहे.
भाजपचा बैठकांचा सपाटा
भाजपने तर बैठकांचा सपाटा सुरू केला. त्या तुलनेत महाआघाडीचे घटकपक्ष अद्यापही पराभवाचे चिंतन करण्यातच मग्न आहेत. अशात येत्या दोन ते तीन महिन्यांत आगामी निवडणुकांना महाआघाडी कसे सामोरे जाणार? हे यंदा बघावे लागणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही पद्धतिने अपयश येणार नाही, याची काळजी भाजप घेत आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.