Breaking

Food and drugs department : अपुऱ्या धान्याचा घोळ थांबवा!

Solve the issue of insufficient grains : राशन विक्रेत्यांची प्रशासनाकडे तक्रार; चौकशीची मागणी

Nagpur एससीआयमधून वाहतूक कंत्राटदाराच्या माध्यमातून मिळणारे धान्य अनेकदा मोजून मिळत नाही. वितरण व्यवस्थेतच अनेक घोळ आहेत. अनेक धान्यांच्या पोत्यात वजनापेक्षा कमी धान्य असते. आक्षेप घेतल्यास वाहन धारकांकडून योग्य वागणूक मिळत नाही, अशी तक्रार करत ऑल महाराष्ट्र प्राइज शॉपकिपर फेडरेशनच्या शिष्टमंडळाने अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली.

रेशन धान्य दुकानात एफसीआय (Food corporation of India)च्या गोदामातून पोहोचणारे धान्य वजनात कमी भरत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले. जिल्हाधिकारी कार्यालयानेही याची दखल घेतली आहे. रेशन विक्रेता संघटनेचे संजय पाटील, रितेश अग्रवाल, दिनेश तानवे, सैय्यद मुस्ताक यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे निवेदन देत भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या.

Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्री म्हणतात, ‘रोजगार वाढवणारा अर्थसंकल्प’

धान्य रेशन दुकानात पोहोचविणाऱ्या वाहन चालकांच्या वागणुकीवरही त्यांनी आक्षेप घेतले. धान्य दुकानात येण्यापूर्वी कुठलीही पूर्वसूचना दिली जात नाही. वेळेचे कुठलेही बंधन नसल्याने रेशन विक्रेते त्रस्त आहेत. धान्य मोजून मागितले तर धमक्याही मिळतात, अशी तक्रारही या निवेदनात करण्यात आली. काही वेळा धान्याचे वितरण केल्यानंतर भरती जास्त आली असे सांगण्यात आले.

Chandrashekhar Bawankule : जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी ठोस पावले

३० ते ४० किलो धान्य दुकानदारांकडून परत घेतले जाते. दुसऱ्या दुकानदारांचे नाव यावेळी घेण्यात येते. या व्यवहारात पारदर्शकता नसल्याने घोळ सुरू असल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.