Footpath traders protest against traffic police’s ‘footpath freedom’ : संविधान चौकात केले आंदोलन सुरू
Nagpur News : फुटपाथवरील व्यावसायीकांच्या विरोधात नागपूर शहर वाहतूक पोलिसांनी आज शुक्रवारपासून कारवाई सुरू केली आहे. ‘फुटपाथ फ्रिडम ‘ Footpath Freedom असे नाव या उपक्रमाला देण्यात आले आहे. पोलिसांच्या या अभियानाने नागपूरकर सुखावले असले तरी फुटपाथ व्यावसायीक मात्र अडचणीत सापडले आहे. पोलिसांच्या या भूमिकेच्या विरोधात हॉकर्स आणि फुटपाथ व्यावसायीक एकवटले आहेत. या व्यावसायीकांच्या सर्व संघटनांनी संविधान चौकात एकत्र येत आंदोलन सुरू केले आहे.
नागपूर शहरात लोक फुटपाथवर गाड्या लावतात. टपऱ्या, ठेले टाकतात. पाहता पाहता तेथे चौपाटी उभी होते. पादचाऱ्यांना जायला जागा उरत नाही. परिणामी त्यांना भरधाव वाहनांच्या मधून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. ही समस्या खूप मोठी आहे आणि अनेक वर्षांपासून आहे. आता पोलिसांनी सुरू केलेला ‘फुटपाथ फ्रिडम ‘हा उपक्रम स्तुत्य आहे. शहरवासीयांना या उपक्रमाने दिलासा मिळणार आहे. पण दुसरीकडे फुटपाथ व्यावसायीक मात्र रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे त्यांनी या व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवला आहे.
IPS Shivdeep Lande : दबंग आयपीएस अधिकाऱ्याचा राजीनामा अखेर मंजूर !
नागपूर शहरात, नागपूर महानगरपालिका आणि शहर पोलिस प्रशासन बेकायदेशीर पद्धतीने फुटपाथ विक्रेत्यांना बाहेर काढण्याच्या मागे लागले आहेत. सतत काही ना काही कार्यक्रम राबवत आहेत. आता तर रात्रीच्या वेळीही कारवाई केली जात आहे. मोठ्या प्रमाणात वस्तू आणि इतर साहित्य जप्त केले जात असल्याचे या व्यावसायीक संघटनांचे म्हणणे आहे. यापुढे आम्ही हा अन्याय सहन करणार नाही, असेही त्यांनी सुनावले आहे.
प्रशासनाच्या मनमानी आणि गुंडगिरीविरुद्ध संयुक्तपणे १७ जानेवारीला एक मोठा निषेध करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला. या निर्णयात महाराष्ट्र फेरीवाला महासंघ, कामगार एकता युनियन, NASVI, नागपूर जिल्हा स्ट्रीट व्हेंडर्स (हॉकर) असोसिएशन, आठवडी बाजार विक्रेते संघटना, राष्ट्रीय मैत्रीय मानव सेवा बहुउद्देशीय संघटना यांचा समावेश आहे.
Amravati Municipal corporation : आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय मिळत नाहीत दाखले !
जर आज महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने फूटपाथवरील विक्रेत्यांना बाहेर काढण्याचा निर्णय घेतला असेल. तर त्याचा एकत्रितपणे प्रतिकार करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. रस्त्यावरील विक्रेत्यांनाही आम्ही संघटीत करत आहोत. एकत्रित ताकद उभी करून आमच्यावर होणाऱ्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध लढा देणार आहोत, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्व संघटनांचे लोक आज शुक्रवारी संविधान चौकात मोठ्या संख्येने एकत्र आले. यावेळी या संघटना आपली एकता आणि ताकद दाखवत आहेत. यावेळी जम्मू आनंद, राजेश विजयकर, कविता धीर, किरण ठाकरे, विनोद तायवाडे, नियाज भाई, सुनील सूर्यवंशी, शिरीष फुलझाले, मोहम्मद भाई, सतीश भेंडे, ममता ढेंगे, किरण वर्मा, संगीता वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले.