For the government, a beloved sister means Take care of the need and let the doctor die : आता लाडक्या बहीणींनी सरकारला त्यांची जागा दाखवावी
Nagpur : महायुतीच्या लोकांना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अॅडव्हान्समध्ये पैसे दिले. निवडणूक झाल्यानंतर मात्र विविध कारणे पुढे केली जात आहेत. ‘गरज सरो अन् वैद्य मरो’, या उक्तीप्रमाणे भाजप आणि त्यांचे सरकार लाडक्या बहिणींना फसवत आहे, असा घणाघाची आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
नागपुरात आज (२० फेब्रुवारी) पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर अॅडव्हान्समध्ये पैसे देणाऱ्या सरकारची निती भ्रष्ट का झाली, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे. लाडक्या बहीणींना फसवण्याचे काम सरकारने केले. संजय गांधी निराधार योजनेतून महिलांना फक्त पाचशे रुपये मिळतील. खरं तर केंद्र सरकारकडून संजय गांधी, श्रावण बाळ योजनेचा निधी मिळतो. पण तो सुद्धा मिळू द्यायचा नाही, असं सत्ताधाऱ्यांचे प्लॅनिंग दिसतंय. त्यामुळे लाडक्या बहिणींनी सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवावी.
पालकमंत्र्यांच्या वादाबाबत विचारले असता, सरकार अस्तित्वात आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. मंत्राच्या चेहऱ्यावर मंत्री होण्याचा आनंद दिसत नाही. प्रचंड बहुमत असताना भांडणं सुरू आहेत. पालकमंत्री पदावरून जिल्हा लुटण्यासाठी चढाओढ आणि स्पर्धा लागलेली आहे. जनतेला लुटून करायची कामं या भांडणांवरून दिसत असल्याचे ते म्हणाले.
एकीकडे अजित पवार स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात. अजित पवार कित्येक वर्ष काँग्रेससोबत होते. आता ते जातीयवादी धर्मांध पक्षांसोबत जाऊन बसले. या लोकांची पुढे काय स्थिती होणार, हे येणारा काळ सांगेल. केवळ आणि केवळ हिंदुंच्या मतांवर प्रभाव टारण्यासाठी हे काम करत आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी अजित पवारांवरही निशाणा साधला.
Delhi Marathi Sahitya Sammelan : मराठी शाळा जगल्या पाहिजे, मुलं मराठीत बोलली पाहिजे
महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांमध्ये वाद वाढल्यानंतर ते दिल्लीत जातात. तेथे मध्ये अमित शाह येतात आणि मग वाद मिटतो. आता हे नेहमीचेच झाले आहे. शाह यांनी एकनाथ शिंदेंनाही शब्द दिला आहे, असे शिंदे सांगतात. आता यावर काय तोडगा काढला जातो, याकडे आमचं लक्ष असणार आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.