Forest Minister Ganesh Naik avoided talking about the Uddhav-Raj Thackeray alliance : म्हणाले मानव वन्यजीव संघर्षात आता लोकांचे जीव जाणार नाही
Nagpur : विदर्भात मानव – वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. यामध्ये लोकांचे बळी जात आहेत. यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आज (ता. ५ जून) चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे त्यांचे आगमन झाले. यावेळी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, ”राजकारणावर मला बोलायचं नाही’, असे उत्तर त्यांनी दिले.
राजकारणावर बोलण्याचे टाळले पण वनविभागाबद्दल वनमंत्री नाईक यांनी भरभरून माहिती दिली. ते म्हणाले. सरकारच्या संबंधित असलेले तंत्रज्ञान इक्युपमेंट लावले जातील. यामध्ये वन्यप्राणी आल्याचा फोटो, व्हिडिओ ती यंत्रणा घेईल आणि सायरन वाजवून अलर्ट देईल. सायंकाळी साडेसात ते सकाळी साडेसात ही वेळ फार महत्वाची असते. त्यासाठी लोकांमध्ये जागृती केली जाईल. सोलर फेन्सींग लावण्यासह अनेक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
Local Body Elections : भाजपचा तरुण नेतृत्वावर विश्वास; मंदार बाहेकर नवे शहराध्यक्ष
नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी येथे वाघाच्या हल्ल्यात एक मृत्यू झाला. त्या ठिकाणी अधिकारी सातत्याने काम करत होते. पण समाजात वनविभागाविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. विभागाचे अधिकारी जे प्रयत्न करतात, ते कुणाला सांगत नसतात. वनविभागाबद्दल काही नालायक लोक बोलत असतात. पण आम्ही आमचे प्रयत्न करत असतो, असे वनमंत्री म्हणाले.
Local Body Elections : शिंदे गटाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का
चंद्रपूर जिल्ह्याच्या गावांतील रस्त्यांवर वाघ येत असतात. त्यामुळे लोकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात आम्ही मायक्रो लेव्हलवर बदल करतोय. यातून निश्चितपणे चांगले बदल होतील आणि मानव – वन्यजीव संघर्ष कमी होईल. यासाठी आम्हाला माध्यमांचीही मदत लागणार आहे, असेही वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.