Breaking

Forest Department of Maharashtra : दहशत पसरविणाऱ्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

Leopard falls into well and dies : वन विभागाचे वाचविण्याचे प्रयत्न ठरले अपयशी

Wardha वाघोडा शिवारात दहशत पसरविणाऱ्या एका बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या बिबट्याला वाचविण्याचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खूप प्रयत्न केला. पण त्यांना अपयश आले. विहिरीत पडल्यानंतर बिबट्याने प्रयत्न केले असावे, असे दिसत होते. मात्र विहीरीत सात फुटापर्यंत पाणी असल्याने बिबट्याची झुंज अपयशी ठरली. आणि त्याचा विहिरीतच मृत्यू झाला.

बिबटाला वनकर्मचाऱ्यांनी विहिरीबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, मदतकार्यास उशीर झाल्याने दुपारी १२:०० वाजताच्या सुमारास बिबट विहिरीतच मृत पावला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या बिबट्याची परिसरात दहशत होती. त्याने शेतातील श्वान, वासरे आदींवर अनेकदा हल्ले केले होते, अशी चर्चा आहे. त्यामुळे पशुपालक धास्तावले होते.

Wardha DPC meeting : ४१६.५८ कोटींच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी

कारंजा (घाडगे) तालुक्यातील वाघोडा शिवारात विश्वनाथ कामडी यांच्या विहिरीजवळ उंबर व आंब्याचे झाड आहे. आंब्याच्या झाडावर रात्री माकडं होती. बिबटाने माकडाची शिकार करण्यासाठी उडी मारली. आणि त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला असावा, असा अंदाज शेतकरी वर्तवत आहे. ही घटना वाघोडा गावापासून ३०० ते ४०० मीटरवरील शेतात घडली.

वनविभागाने त्याला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, मदतकार्याला उशीर झाल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरून बिबट्याचा अखेर मृत्यू झाला. वाघोडा येथील विश्वनाथ बारकू कामडी यांच्या शेतात गोटा फाडीने बांधलेली २० फूट खोल विहीर आहे. विहिरीला ७ ते ८ फूट पाणी आहे. या विहिरीमध्ये गुरुवारी मध्यरात्री ३:३० वाजताच्या सुमारास एक बिबट पडला. तो गंभीर जखमी झाला होता. शुक्रवारी सकाळी ही बाब शेतकऱ्याच्या लक्षात आली. संपूर्ण गाव व परिसरात ही चर्चा पसरली. त्यामुळे बिबट्याला पाहण्यासाठी शेतात गर्दी झाली होती.

विहिरीत बिबट पडल्याची माहिती लगेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर सकाळी ९:०० वाजताच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वन अधिकारी व तहसील कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळावर पोहोचले. तोपर्यंत परिसरात मोठी गर्दी झाली होती. विहिरीत ७ ते ८ फूट पाणी असल्याने बिबट इलेक्ट्रिक मोटरपंपाच्या एचडीपी पाइपाला पकडून होता. मात्र, तो जखमी अवस्थेत होता.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले, ‘वाद नाहीत तर संमेलन कसले!’

मृत बिबट्याचा वनकर्मचारी व डॉक्टरांनी पंचनामा केला. त्याच्यावर जुनापाणी १८० आरएफ शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळावर वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र सावंत, कर्मचारी पुरुषोत्तम कळसाईत यांच्यासह कारंजा, वर्धा येथील वन अधिकारी, कर्मचारी, तहसील कर्मचारी, पोलिस उपस्थित होते.