One-year-old leopard rescue operation successful : रोहिणखेड येथे विहिरीत पडले; तीन तास Rescue Operation
Buldhana माेताळा तालुक्यातील रोहिणखेड शिवारात विहिरीत पडलेल्या एका वर्षाच्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने मंगळवारी संध्याकाळी यशस्वीरित्या Rescue केले. सध्या बिबट्याला मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. लवकरच त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून रोहिणखेड शिवारात बिबट्याच्या हालचाली वाढल्या होत्या. काही ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी, वनविभागाकडे बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी होत होती. यानंतर वनविभागाने परिसरात पिंजरे लावले होते. तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने बिबट्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, बिबट्या काही सापडत नव्हता.
Chandrashekhar Bawankule : होय..! जयंत पाटलांना माझ्या बंगल्यावर भेटलो, पण..
मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी स्थानिक शेतकरी आसिफ चौधरी यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याचे निदर्शनास आले. पडल्यावर तो विहिरीतील एका कपारीत जाऊन बसला होता. घटनेची माहिती मिळताच मोताळा वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर पडोळ यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले.
या बचाव मोहिमेसाठी उपवनसंरक्षक सरोज गवस आणि सहाय्यक वनसंरक्षक अश्विनी अपेट यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा येथील वन्यजीव तज्ज्ञ संदीप मडावी, विलास मेरत आणि त्यांची टीम, तसेच मोताळा वनविभागाचे रोहिणखेड राऊंडचे वनपाल सुधीर जगताप, ए.एन. सपकाळ आणि वनरक्षक आर.बी. सिरसाट घटनास्थळी दाखल झाले.
विहिरीत अडकलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी तीन तास प्रयत्न करण्यात आले. वनविभागाच्या पथकाने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करत बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात पकडले. यानंतर त्याला मोताळा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बिबट्याला वैद्यकीय तपासणीअंती योग्य ठिकाणी जंगलात सोडण्यात येणार आहे. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.