Animal census today in all sanctuaries in the state : विदर्भातील अभयारण्ये सज्ज; वन्यजीव विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यांचीही नजर
Buldhana प्रत्येक बुद्ध पौर्णिमेला वन्यजीवांची मोजणी करण्याची परंपरा यंदाही जपली जाणार आहे. संपूर्ण विदर्भातील अभयारण्यांमध्ये प्राणीगणनेची तयारी पूर्ण झाली आहे. वन्यजीव विभागाच्या ट्रॅप कॅमेरांचीही नजर प्राण्यांवर असणार आहे.
‘निसर्ग अनुभव’ उपक्रमांतर्गत आज, सोमवार, दि. १२ मे रोजी रात्री बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात प्राणीगणना होणार आहे. बुलढाणा वन्यजीव विभागाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीच्या शांततेत आणि चांदण्याच्या प्रकाशात पर्यटकांना मचानीवरून वन्यप्राण्यांचे निरीक्षण करता येणार आहे. यासाठी बुलढाणा आणि खामगाव रेंजमध्ये एकूण २० मचाणी उभारण्यात आल्या आहेत. वनधिकारी, वनरक्षक, वनपाल, मजूर, निसर्गप्रेमी आणि पक्षीमित्रांचा सहभाग यात असणार आहे.
Operation Sindoor : सून ले पाकिस्तान, बाप तुम्हारा हिंदुस्तान!
गणना प्रक्रियेअंतर्गत, पाणवठ्यांवर रात्रीपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत सलग निरीक्षण केले जाते. एका मचाणावर एक वनकर्मी आणि एक पर्यटक असतो. प्राण्याचा प्रकार, लिंग आणि पाणवठ्यावर येण्याची वेळ याची अचूक नोंद घेतली जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही वन विभागाने जंगलातील पाणी असलेल्या पाणवठ्यांची यादी तयार केली आहे. प्रत्येक ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावून प्राण्यांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार आहे. या उपक्रमासाठी सर्व तयारी पूर्ण असून, ही माहिती बुलढाणा आरएफओ प्रकाश सावळे आणि खामगाव आरएफओ दीपेश लोखंडे यांनी दिली आहे.
Adv. Prakash Ambedkar : युद्धबंदीची माहिती प्रथम अमेरिकेकडूनच का?
राज्यातील सर्वच अभयारण्यांमध्ये तयारी
राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यामध्ये वन्यप्राणी गणना होणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात यासाठी बफर क्षेत्रात ७६ मचाण तयार केले आहे. त्यासाठी १९८ वन्यजीव अभ्यासक आणि स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे. लोकसंख्या मूल्यांकन पद्धतींद्वारे वन्यजीव निरीक्षण व संवर्धनासाठी ही गणना सोमवारी दुपारी तीन वाजता सुरू होईल. १३ मे रोजी सकाळी सहा वाजता संपणार आहे.