Forged signature : थेट अजित पवारांची बनावट सही करून शिक्का मारला!

Letter filed at Planning Office; stir in administration : पत्र नियोजन कार्यालयात दाखल; प्रशासनात खळबळ

Mumbai: राज्यात बनावट पत्र आणि ओळखपत्र फसवणुकीच्या घटना वाढत असतानाच आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाचा वापर करून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकाराने जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजलगाव तालुक्यातील लहामेवाडी येथील अशोक वाघमारे या व्यक्तीने अजित पवार यांच्या नावाने बनावट सही आणि शिक्क्यासह एक पत्र तयार केले. हे पत्र थेट बीड जिल्हा नियोजन कार्यालयात सादर करण्यात आले. मात्र अधिकाऱ्यांच्या लक्षात संशयास्पद बाबी आल्याने त्यांनी पत्राची चौकशी केली असता सही बनावट असल्याचं स्पष्ट झालं.

Navneet Rana : माझ्याकडे 50 जणांची गँग, तुझ्यावर सामूहिक अत्याचार करून मारून टाकू!

यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने तत्काळ पोलिसांना कळवून अशोक वाघमारेविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणेतील गोपनीयता, सुरक्षा आणि दस्तऐवजांच्या विश्वसनीयतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. उच्चपदस्थ नेत्यांच्या नावाने अशा प्रकारे बनावट पत्र सादर करण्याची धाडसी कारवाई म्हणजे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

Local Body Elections : मतदार याद्यांमधील घोळांवर राजकीय मौन, डोणगाव सर्कलमध्ये नावांमधील चुकांचा महापूर

यापूर्वीही बीडमध्ये अशाच प्रकारची घटना घडली होती. जुलै 2025 मध्ये भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या नावाने बनावट सही आणि लेटरहेड वापरून तब्बल तीन कोटी वीस लाख रुपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याचे प्रकरण उघड झाले होते. त्या घटनेनंतर प्रशासनाने चौकस भूमिका घेतली असली, तरी अशा प्रकारच्या फसवणुकींचा सुळसुळाट अजूनही थांबलेला नाही.

Illegal liquer sell : महिलांचे संसार वाचविण्यासाठी ठिय्या आंदोलन; अवैध दारूविक्रीविरोधात एल्गार

दरम्यान, मुंबईतही अशाच स्वरूपाचा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्र्यांचा पीए असल्याचा बनाव करून दोन व्यक्तींनी पोलीस आयुक्तांच्या जनता दरबारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. धीरेंद्रकुमार व्यास आणि भरत मन अशी त्यांची नावे असून, पोलिसांनी चौकशीदरम्यान दोघांचा बनाव उघड केला. या दोघांविरुद्धही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड आणि मुंबईतील या सलग घडामोडींमुळे राज्यातील प्रशासकीय सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, अशा फसवणूक प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

______