Sharad Pawar Extends Support to Bachchu Kadu’s Maha Elgar Agitation : जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवा, अनिल देशमुख यांचे आवाहन
Nagpur : कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, तसेच अपंग, मच्छीमार, शेतमजूर आणि मेंढपाळ बांधवांच्या न्याय्य मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली विविध समविचारी पक्ष आणि संघटनांनी आज (२८ ऑक्टोबर) नागपूर शहरात ‘महाएल्गार आंदोलन’ आयोजित केले आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)च्या वतीने राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
देशमुख म्हणाले, “आज शेतकरी, कामगार, मच्छीमार आणि अपंग बांधवांचा आवाज दुर्लक्षित होत आहे. जनतेच्या हक्कासाठी बोलणारे आवाज दाबले जात आहेत. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी आणि महायुतीच्या निष्क्रिय कारभाराविरोधात हे आंदोलन अत्यंत गरजेचे आहे.”
Maharashtra Government : ६००० रुपये द्या, एसीमध्ये चहा-कॉफी प्या!
ते पुढे म्हणाले, “जनसामान्यांचा आवाज महत्त्वाचा आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या या ‘महाएल्गारा’त हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.”
या आंदोलनात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी, शेतमालाला कायदेशीर हमीभाव, दुष्काळग्रस्तांना तत्काळ मदत, तसेच अपंग, मच्छीमार आणि शेतमजुरांसाठी कल्याणकारी योजना राबविण्याची मागणी करण्यात येणार आहे.
समविचारी पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा या आंदोलनात मोठा सहभाग अपेक्षित आहे. राज्यभरातून शेकडो ट्रॅक्टर, बैलबंड्या आणि हजारो कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झालंे असल्याने शहरात उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
Local Body Elections : दिवाळीची आतषबाजी संपली, आता वाजणार निवडणुकांचे ‘फटाके’!
या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनआवाज आणि प्रशासन यांच्यातील अंतर मिटवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखालील हे ‘महाएल्गार आंदोलन’ महाराष्ट्रातील शेतकरी व श्रमिकांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधणारा ठरणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








