Farmer asked for money, complaint filed with police : शेतकऱ्याला मागितले पैसे, पोलिसांत तक्रार
Sambhajinagar : संभाजी}}नगरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने शेतकऱ्याची झाल्याची घटना समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने स्वतःला “बावनकुळे साहेबांचा पीए” असल्याचे सांगत शेतकऱ्याला फोन केला आणि काम मार्गी लावण्याचे आश्वासन देत पैशांची मागणी केली. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जगन्नाथ जयाजी शेळके हे तक्रारदार शेतकरी असून त्यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांच्या फेसबुक पेजवर आपली अडचण मांडली होती. शेजारच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवला आहे, त्यामुळे लागवड करता येत नाही, अशी तक्रार केली होती.
याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने शेळके यांना फोन करून,
मी बावनकुळे साहेबांचा पीए बोलतोय. रस्त्याची मोजणी करण्यासाठी माणसं पाठवतो, पण पोलिस बंदोबस्तासाठी पैसे द्यावे लागतील, असे सांगत क्यूआर कोड पाठवून पैशांची मागणी केली.
Ministers U turn : क्रीडा खातं बरं होतं; आता त्रास घ्यावाच लागेल
शेतकऱ्याला दोन वेळा पैशांची मागणी करण्यात आली. पहिल्यांदा काम होईल या अपेक्षेने त्यांनी 3 हजार रुपये पाठवले. मात्र त्यानंतरही पुन्हा पैसे मागितले जाऊ लागल्याने शेतकऱ्याला संशय आला. शेवटी त्यांनी थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.तक्रारदार शेतकऱ्याने आपल्या आणि त्या अज्ञात व्यक्तीमधील फोन संभाषणाचे रेकॉर्डिंगही पोलिसांना दिले आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर पोलीस त्या कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे तपास करत आहेत.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा वापर करून शेतकऱ्याची फसवणूक करणारा हा व्यक्ती नेमका कोण? याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठं आव्हान ठरणार आहे.
____